ऋषभ पंत अन् कुलदीप आपला संघ बदलणार? (फोटो- सोशल मीडिया)
आयपीएल 2027 चा लिलाव होण्याआधी क्रिकेट विश्वामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा फलंदाज आणि लखनौ संघाचा माजी कर्णधार ऋषभ पंत आणि फिरकीपटू कुलदीप यादव आगामी हंगामात नव्या संघांमधून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. आयपीएल 2027 आधी संघ मजबूत करण्याची तयारी सुरू झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी हंगामात खेळाडूंची अदलाबदली होऊ शकते. यामध्ये मोठे उलतफेर पाहायला मिळू शकतात.
यामध्ये कुलदीप यादव आणि ऋषभ पंतचे नाव आघाडीवर येत आहे. ऋषभ पंतने लखनौचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे तो आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्स या त्याच्या पहिल्या संघात पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऋषभ पंतचे आणि दिल्ली कॅपिटल्सचे अत्यंत जुने नाते आहे. दिल्ली कडूनच त्याने आपल्या आयपीएल करियरची सुरुवात केली होती. तो या संघाचा कर्णधारही राहिला आहे. त्यानंतर तो एलएसजी संघात कर्णधार म्हणून आला होता. पंतची आक्रमक फलंदाजी आणि कर्णधारपदाचा अनुभव दिल्लीला पुन्हा एकदा विजेतेपदाच्या शर्यतीत आणू शकतो. त्यामुळे ही बदल होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.
IPL मध्ये खळबळ! 27 कोटींचा डाव फिस्कटला; LSG च्या फ्लॉप शो नंतर Rishabh Pant ने सोडले कर्णधारपद
Rishabh Pant ने सोडले कर्णधारपद
आयपीएल 2026 मध्ये लखनौच्या संघाला आणि कर्णधार म्हणून ऋषभ पंतला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. दोघांसाठी यंदाचा हंगाम निराशाजनक ठरला. ऋषभ पंतने स्वतःहून फ्रँचायझीकडे कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती, जी व्यवस्थापनाने मान्य केली आहे. आयपीएल 2026 मध्ये लखनौचा संघ शेवटच्या स्थानावर होता. 14 पैकी 4 सामने लखनौने जिंकले होते. तर 10 सामने पराभव झाला होता. 27 कोटींची विक्रमी बोली लागलेल्या पंतला या हंगामात फलंदाजीतही फारशी चमक दाखवता आली नव्हती.
IND vs AFG: टीम इंडियातून Rishabh Pant ची हकालपट्टी का झाली? गौतम गंभीर यांचा मोठा खुलासा
संघाचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी सांगितले, ‘लखनौचा संघ आता पुनर्रचनेच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत आहे. ऋषभ पंतने स्वतः पदमुक्त करण्याचा विनंती केली होती. आम्ही त्याच्या योगदानाबद्दल कृतज्ञ आहोत, परंतु आता आम्हाला भविष्याचा विचार करून नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे.’






