ऋषभ पंतने सोडले लखनौचे कर्णधारपद (फोटो- ians)
ऋषभ पंतणे सोडले लखनौचे कर्णधारपद
आयपीएल 2026 मध्ये लखनौची अत्यंत खराब कामगिरी
वैयक्तिक कामगिरीत देखील ऋषभ पंत ठरला अपयशी
Rishabh Pant: आयपीएल 2026 चा हंगाम संपत आला आहे. आज क्वालिफायर 2 चा सामना होणार आहे. यंदा लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पॉईंट्स टेबलमध्ये 10 व्या स्थानावर होता. कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौच्या संघाची कामगिरी चांगली ठरली नाही. अखेर ऋषभ पंतने लखनौच्या संघाचे कर्णधारपद सोडल्याचे समोर आले आहे.
आयपीएल 2026 मध्ये लखनौच्या संघाला आणि कर्णधार म्हणून ऋषभ पंतला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. दोघांसाठी यंदाचा हंगाम निराशाजनक ठरला. ऋषभ पंतने स्वतःहून फ्रँचायझीकडे कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती, जी व्यवस्थापनाने मान्य केली आहे. आयपीएल 2026 मध्ये लखनौचा संघ शेवटच्या स्थानावर होता. 14 पैकी 4 सामने लखनौने जिंकले होते. तर 10 सामने पराभव झाला होता. 27 कोटींची विक्रमी बोली लागलेल्या पंतला या हंगामात फलंदाजीतही फारशी चमक दाखवता आली नव्हती.
Official announcement. pic.twitter.com/7WeOwpkDr6 — Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 29, 2026
संघाचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी सांगितले, ‘लखनौचा संघ आता पुनर्रचनेच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करत आहे. ऋषभ पंतने स्वतः पदमुक्त करण्याचा विनंती केली होती. आम्ही त्याच्या योगदानाबद्दल कृतज्ञ आहोत, परंतु आता आम्हाला भविष्याचा विचार करून नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे.’
बातमी अपडेट होत आहे…






