Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर चाहत्यांचे होणार स्वप्नभंग; रोहित शर्मा करणार ‘या’ गोष्टीला अलविदा.. 

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेच्या तयारीला सुरुवात  करणार आहे. भारताला स्थिर नेतृत्व मिळावं, या दृष्टीने भारतीय संघाच्या कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 08, 2025 | 03:07 PM
Champion Trophy 2025: Fans' dreams will be shattered after the Champions Trophy; Rohit Sharma will say goodbye to 'this' thing..

Champion Trophy 2025: Fans' dreams will be shattered after the Champions Trophy; Rohit Sharma will say goodbye to 'this' thing..

Follow Us
Close
Follow Us:

Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने  स्पर्धेतील सर्व सामने जिंकून दिमाखात अंतिम फेरी गाठली आहे. उद्या म्हणजेच रविवार, 9  मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत न्यूझीलंडशी भिडणार  आहे. रोहित शर्माने भारतीय संघाचे शानदार नेतृत्व केले आहे. मात्र, असे असून देखील  रोहित शर्मा भारतीय संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

रोहित शर्माने संघाचे कर्णधारपद सांभाळत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. तसेच रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानेही चांगली कामगिरी केली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चार आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मात्र, आता रोहितच्या कर्णधारपदाबाबत आता निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :  Champions Trophy 2025 : आर अश्विनने ट्रोलर्सला फटकारलं, दुबईमध्ये भारताच्या खेळण्याच्या वादावर सांगितलं स्पष्ट

रोहित शर्मा यशस्वी कर्णधार..

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. त्याच वेळी, त्याने एकदिवसीय विश्वचषक 2023 आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही धडक मारली. आता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीतही पोहचला आहे. दुबईत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना रोहितचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना असण्याची शक्यता आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेच्या तयारीला सुरुवात  करणार आहे. रोहितने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण, तरीही तो वनडे आणि कसोटी खेळू शकणार आहे. मात्र, त्याचा अलीकडचा फॉर्म चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे रोहित शर्मा मोठा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :  India vs New Zealand final match : चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधील भारतीय संघाच्या आतापर्यतच्या अपराजित प्रवासावर टाका नजर

मीडिया वृत्तानुसार, भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनलचा निकाल नेमका काय लागतो? यावर रोहित शर्माची भविष्यातील रणनीती ठरवणार आहे.  कारण, बीसीसीआय एकदिवसीय विश्वचषक 2027 डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघाला एका स्थिर नेतृत्व शोधत आहे.

रोहित शर्मा निवृत्ती घेणार का?

रिपोर्टनुसार, असेही म्हटले आहे की, रोहित शर्माचा विश्वास आहे की त्याच्यामध्ये अजूनही बरेच क्रिकेट शिल्लक आहे आणि तो निवृत्त होणार नाही. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर तो कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार राहणार की नाही? हे अद्याप ठरलेले नाही.

बीसीसीआयच्या सूत्राकडून सांगण्यात आले आहे की, निवृत्ती घ्यायची की नाही हा त्याचा निर्णय आहे, पण कर्णधारपद कायम ठेवण्याबाबत  चर्चा होईल. संघाला विश्वचषकाची तयारी करायची आहे, त्यामुळे तर स्थिर कर्णधाराची गरज आहे.  हे स्वत: रोहित शर्मालाही समजले आहे. कोहलीशीही याबाबत चर्चा झाली असून त्याच्याबद्दल फारशी चिंता नसल्याचे सांगितले जात आहे.

गंभीर-आगरकर यांच्यासोबत चर्चा

रिपोर्टनुसार,  मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2025 च्या पराभवानंतर रोहित शर्माच्या भविष्यातील रणनीतीबद्दल बीसीसीआय आणि स्वत: भारतीय कर्णधाराशी आधीच चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title: Rohit sharma will step down as captain of the indian team after the icc champions trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • bcci
  • Champion Trophy 2025
  • ICC
  • Rohit Sharma
  • virat kohali

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
1

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
2

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया
3

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी
4

T20 Asia Cup मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू कोण? हार्दिक पंड्याकडे त्याला मागे टाकण्याची नामी संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.