फोटो सौजन्य - BCCI/Youtube
India vs New Zealand Final Match : चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना ९ मार्च रोजी होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड दुसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफीच्या स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. टीम इंडिया आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळत आहे. पण बऱ्याच दिवसांपासून चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताचा संघ दुबईमध्ये एकाच मैदानावर सर्व सामने खेळत असल्याचा वाद सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्यामुळे टीम इंडियाला त्याच मैदानावर खेळण्याचा फायदा मिळत असल्याचा वाद निर्माण झाला आहे. आता या मुद्द्यावर भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज आर. अश्विनने विरोधकांना गप्प केले आहे.
२०२५ मध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तान करणार आहे. त्यामुळे टीम इंडियाने दुबईमध्ये त्यांचे सर्व सामने हायब्रिड मॉडेल अंतर्गत खेळले आहेत. आता टीम इंडियाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळल्याने विरोधक नाराज आहेत. टीम इंडियाला एकाच शहरात आणि एकाच मैदानावर खेळण्याचा फायदा मिळत आहे, अशी अनेक विधाने समोर आली. आता, या विरोधकांना बंद करत, आर अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, “स्पर्धा कामगिरीच्या आधारे जिंकल्या जातात, सबबी सांगून नाही.”
रविचंद्रन अश्विन पुढे म्हणाला, “जेव्हा लोक आपल्या कर्णधार आणि प्रशिक्षकाला दुबईत खेळण्याच्या फायद्यांविषयी एकच प्रश्न विचारतात तेव्हा मला हसू येते. २००९ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, दक्षिण आफ्रिकेने त्यांचे सर्व सामने एकाच ठिकाणी खेळले आणि तरीही त्यांना बाद फेरीसाठी पात्रता मिळवता आली नाही. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेला पात्रता मिळवता आली नाही ही त्यांची चूक नव्हती. संघ चांगले क्रिकेट खेळतात म्हणूनच ते पात्र ठरतात.”
Behind a successful team is a bunch that works tirelessly to help #TeamIndia prepare for Match Day 💪🏻
A day before the grand finale, we take a sneak peak into the 𝙏𝙚𝙖𝙢 𝙗𝙚𝙝𝙞𝙣𝙙 𝙩𝙝𝙚 𝙏𝙚𝙖𝙢 🙌
WATCH 🎥🔽 #INDvNZ | #ChampionsTrophy https://t.co/8gf9PWdS9A
— BCCI (@BCCI) March 8, 2025
आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला कधीही न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. २००० मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने पहिल्यांदा भारताला पराभूत केले. यानंतर, २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा पराभव झाला. त्याच वेळी, २०२१ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. आता संघाला किवी संघाकडून या पराभवांचा बदला घ्यायचा आहे.