पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो हा जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक आहे. अशा या जगविख्यात रोनाल्डोने फ़ुटबाँलच्या मैदानावर विक्रमांचे डोंगर रचले आहे. रोनाल्डोने आता अजून एका विक्रमला गवसणी घातली आहे. मात्र यावेळी रोनाल्डोने फुटबॉलच्या मैदानावर नाही तर इंस्टाग्रामच्या मैदानावर हा विक्रम रचला आहे. ख्रिस्टियानो रोनाल्डो हा सोशल मीडियावर देखील बराच ऍक्टिव्ह असून त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ५०० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. इतके फॉलोअर्स असलेला तो जगातील पहिला व्यक्ती आहे.
रोनाल्डोने इंस्टाग्रामवर ५०० मिलियन म्हणजेच ५० कोटीं फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. इंस्टाग्रामवर ५० कोटी फॉलोअर्स असलेला रोनाल्डो हा जगातील पहिला क्रीडापटू ठरला आहे. इंस्टाग्रामशिवाय रोनाल्डोचे ट्विटवर १०.५ कोटी व फेसबूकवर १५.४ कोटी फॉलोअर्स आहेत.
ख्रिस्टियानो रोनाल्डो इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी १९.७१ कोटी रूपये घेतो . रोनाल्डोला ५०० मिलियन लोक फॉलो करीत असले तरी रोनाल्डो मात्र केवळ ५२३ लोकांनाच फॉलो करतो. फुटबॉल जगतात त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी सजमला जाणारा अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सीचे ३७६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत तर भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्तम फलंदाज विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर २२४ मिलियन फॉलोअर्स आहेत.