आरसीबीचा चेन्नईवर विजय (फोटो -ट्विटर)
IPL 2025: आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आयपीएलचा सामना पर पडला. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने चेन्नई सुपर किंग्जवर 2 धावांनी विजय प्राप्त केला आहे. आज आयपीएलचा 52 वा सामना पार पडला. आजचा चेन्नई विरुद्ध बंगलोर हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. अखेरच्या क्षणी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने चेन्नईवर विजय प्राप्त केला आहे.
This is RCB.
This is our HOME.
This is ನಮ್ಮ CHINNASWAMY.— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 3, 2025
टॉस हरल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला प्रथम फलंदाजी करावी लागली. विराट कोहली आणि जेकोब बेथेल यांनी चांगली भागीदारी रचत बंगलोरला धावसंख्या उभरण्यात मदत केली. मात्र त्यानंतर आलेल्या देवदत्त पदीकल आणि राजत पाटीदार काही खास खेळी करू शकले नाहीत. मात्र रोमारीयो शेफर्डने शेवटच्या क्षणी मोठे फटके मारून बंगलोरला 200 पार नेले.
त्यानंतर चेन्नईचा संघ फलंदाजी करण्यासाठी आला. मात्र चेन्नईल हे आव्हान पार करता आले नाही. नवख्या आयुष म्हात्रेने तडाखेबंद 94 धावांची खेळी केली. मात्र चेन्नईला पराभव स्वीकारावा लागला.
विराटचा ‘क्लास’ रेकॉर्ड
दरम्यान या सामन्यात चेस मास्टर विराट कोहलीने एक जबरदस्त रेकॉर्ड केला आहे. एकाच टीमसाठी टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी तब्बल 300 षटकार मारले आहेत. विराट कोहलीने हा रेकॉर्ड बंगळुरू स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध केला आहे. सामन्यातील तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने दोन षटकार मारून हा रेकॉर्ड केला आहे . विराट कोहलीने पहिलं षटकार मारल्यावर 300 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने अजून एक सिक्स मारला. आता विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी 301 सिक्स मारले आहेत.
Virat Kohli: विराटचा ‘क्लास’ रेकॉर्ड; T-20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा ठरला एकमेव फलंदाज
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगमंत आतापर्यंत 51 सामने खेळवण्यात आले आहेत. गुणतालिकेत मोठे उलटफेर बघायला मिळत आहेत. गुरुवारी सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या मुंबई इंडियन्सकडून १०० धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे, राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२५ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. हा पराभव आरआरचा ११ सामन्यांमधील तब्बल ८ वा पराभव ठरला.
प्रथम फलंदाजी करताना एमआयने २ बाद २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, आरआर १७व्या षटकात ११७ धावांवर गारद झाला. सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर होत्या, जो दीपक चहरच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. एमआयने सलग सहावा विजय नोंदवला. या पराभवासह, आरआर आयपीएल २०२५ मधून बाहेर पडणारा चेन्नई सुपर किंग्जनंतरचा दुसरा संघ बनला आहे. याशिवाय, इतर संघ अजून देखील प्लेऑफच्या स्पर्धेत टिकून आहेत.