ऋतुराज गायकवाडचे दमदार अर्धशतक आणि शिवम-रिंकूचा दमदार खेळामुळे भारताने 20 षटकांत पाच विकेटच्या मोबदल्यात 185 धावांपर्यंत मजल मारली. ऋतुराज गायकवाड याने 58 धावांची खेळी केली. संजू सॅमसन याने 40 तर रिंकू सिंह याने झटपट 38 धावांचे योगदान दिले. आयर्लंडपुढे विजयासाठी 186 धावांचे आव्हान आहे.
रिंकू-शिवमची दमदार खेळी
आघाडीची खेळाडू तंबूत परतल्यानंतर रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांनी भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. रिंकू सिंह याने 21 चेंडूत 38 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. तर शिवम दुबे याने 16 चेंडूत दोन षटकाराच्या मदतीने नाबाद 22 धावा जोडल्या. या जोडीने अखेरच्या काही षटकार या जोडीने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत भारताची धावसंख्या 180 च्या पार पोहचवली. रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांनी अवघ्या 28 चेंडूत 55 धावांची भागिदारी केली. यामध्ये रिंकूने 12 चेंडूत 28 चक शिवम याने 16 चेंडूत 22 धावांचे योगदान दिले.
यशस्वी जायस्वाल आणि तिलक वर्मा लागोपाठ तंबूत परतल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. ऋतुराज गायकवाड याने 43 चेंडूत 58 धावांची झंझावती खेळी केली. तर संजू सॅमसन याने 26 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले. ऋतुराज गायकवाड याने एक षटकार आणि चार चौकार ठोकले. तर संजू सॅमसन याने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 49 चेंडूत 71 धावांची दमदार भागिदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. त्याआधी यशस्वी जायस्वाल याने 11 चेंडूत 18 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. तिलक वर्मा याला आजच्या सामन्यातही लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. पहिल्या सामन्यात तिलक वर्मा गोल्डन डकचा शिकार झाला होता. तर आजच्या सामन्यात तिलक वर्मा याला फक्त दोन धावा करता आल्या.
नाणेफेकीचा कौल आयर्लंडच्या बाजूने –
दुसऱ्या टी 20 सामन्यात आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पॉल स्टर्लिंग याने पाहुण्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आंत्रित केले होते. दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया आणि आयर्लंड यांनी कोणताही बदल केला नव्हता. पहिल्या सामन्यातील संघ मैदानात उतरवले.






