Beed News: १९ मार्चला शेतकरी सहवेदना दिन; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आधार देणाऱ्यांचा सन्मान सोहळा (फोटो-सोशल मीडिया)
Beed News: १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमास माजी राज्यमंत्री बच्चू कडू तसेच पत्रकार सरिता कौशिक उपस्थित राहणार आहेत. यात सहभागी होण्याचे आवाहन संयोजक सुदर्शन रापतवार व कालिदास आपेट यांनी केले आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आधार देणाऱ्या कार्यकर्त्यास किंवा संस्थेस दरवर्षी ‘शेतकरी सहवेदना पुरस्कार’ दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार बच्चू कडू यांना प्रदान करण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व गुलाबपुष्प असे पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे.
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर
१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे व मालतीताई करपे यांनी आर्थिक विवंचनेतून आपल्या चार लहान मुलांसह सामूहिक आत्महत्या केली होती. शासनदरबारी नोंद झालेली ही पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते. त्यानंतर शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असल्याच्या पार्श्वभूमीवर किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून हा दिवस ‘शेतकरी सहवेदना दिवस’ म्हणून पाळण्यात येतो व एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन केले जाते. १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता नगरपरिषदेच्या आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहासमोरील चिंचेच्या झाडाखाली सामूहिक उपवासास प्रारंभ होणार आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी बहिणींचा होणार सन्मान
मुख्य कार्यक्रमात आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या तीन विधवा पत्नींचा प्रातिनिधिक स्वरूपात साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. पत्रकार सरिता कौशिक यांचे ‘शेतकरी आत्महत्या: कारणे आणि मीमांसा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
बीडला अजित पवार यांचे स्मारक होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील
कार्यक्रमाच्या शेवटी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीसह सामूहिक उपवास सोडण्यात येणार आहे. प्रगतिशील शेतकरी व अभ्यासक अनिरुद्ध चौसाळकर यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी संयोजक सुदर्शन रापतवार, अमर हबीब, कालिदास आपेट, अच्युत बापू गंगणे, संतोष पवार, वसंत मोरे, शांतिनाथ बनसोडे, मुजीब काजी, अनिरुद्ध चौसाळकर, सुभाष बाहेती, पंडीत कराड, सुरेश आरसुडे, मदन परदेशी, संतोष बोबडे, शैलजा बरुरे, सुरेश सोनवळकर, दगडू लोमटे, गोरख शेंद्रे, महावीर भगरे, व्यंकटेश जोशी, इस्माईल शेख, लखन होके, कल्याणराव भगत, रेखा देशमुख, किरण देशमुख, सुनील सौंदरमल, सुनील पन्हाळे, अनिता कांबळे, प्रतिभा अवचर, अनिकेत डिघोळकर, दत्तात्रय अंबेकर नियोजन करत आहेत.






