Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘2029 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील; सत्ताबदल त्यांच्या कारभारामुळेच..,’ पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 2029 मध्ये सत्ताबदल होईल, असा दावा करत त्यांनी शिक्षणमंत्रीपद आणि नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवरही प्रश्न उपस्थित केले.

  • By विवेक
Updated On: Aug 21, 2026 | 02:50 PM
पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Follow Us
Follow Us:
  • 2029 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
  • फडणवीस शिक्षणमंत्री झाल्यास विरोध करू, असा इशारा.
  • नाशिक कुंभमेळ्यात सहा कोटी भाविकांचा भार झेपणार का? – पृथ्वीराज चव्हाण
 

आगामी काळात देशात सत्ताबदल निश्चितपणे होईल आणि त्यासाठी विरोधी पक्ष किंवा काँग्रेस कारणीभूत ठरणार नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षांतील कारभारामुळेच हा बदल घडेल, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. शुक्रवार (21 ऑगस्ट) नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “2029 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान असणार नाहीत. त्यामुळे भाजपमध्ये आतापासूनच नेतृत्वाचा चेहरा बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उपपंतप्रधान व्हायचे आहे,” असेही त्यांनी यावेळी म्हटले.

2029 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील; सत्ताबदलाचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

केंद्रात सत्ताबदल कधी होईल, हे काळ ठरवेल. मात्र, मोदी सरकारच्या उर्वरित कार्यकाळात देशाचा पुढचा पूर्णवेळ शिक्षणमंत्री कोण असेल, हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे आधीपासूनच इतर महत्त्वाची खाती असल्याने शिक्षणासारख्या मोठ्या खात्यासाठी पूर्णवेळ मंत्र्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Rahul Gandhi Parliament Street News: संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर हायव्होल्टेज ड्रामा; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे राजकारण तापणार

देशाला विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेणारा आणि परीक्षाव्यवस्थेतील गोंधळ कमी करण्यासाठी प्रभावी भूमिका घेणारा शिक्षणमंत्री आवश्यक आहे. मूलभूत शिक्षणातील समस्या जाणणाऱ्या व्यक्तीकडे हे खाते असावे, असे चव्हाण म्हणाले. मात्र, सध्याच्या मोदी सरकारमध्ये अशा प्रकारची योग्य व्यक्ती दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळण्याच्या चर्चा सुरू असल्या तरी ते शिक्षणमंत्री झाल्यास आम्ही त्याला विरोध करू, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर पेपरफुटीच्या घटना घडल्या असून, त्यामुळे फडणवीस शिक्षणमंत्रीपदासाठी योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

नाशिक कुंभमेळ्यात सहा कोटी भाविकांचा भार शहर झेपवणार का?

नाशिकच्या पायाभूत सुविधांवरही चव्हाण यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समृद्धी महामार्गाने प्रथमच नाशिकला येताना योग्य दिशादर्शक फलक नसल्याने रस्ता चुकल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. शहरात येताना खड्ड्यांचाही अनुभव आल्याचे ते म्हणाले.

मतदारयादी शुद्धीकरणाचा भाजपलाच लाभ, २०२९च्या निवडणुकीत मोठा फायदा होईल; खासदार धनंजय महाडिक यांचा दावा

आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये तब्बल सहा कोटी लोक आले, तर शहराची यंत्रणा आणि पायाभूत सुविधा हा प्रचंड भार झेलू शकतील का, याचा गांभीर्याने विचार झाला आहे का, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. कुंभमेळ्याच्या तयारीत केवळ खर्चावर भर न देता नियोजन आणि दर्जेदार सुविधा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Web Title: Prithviraj chavan on pm modi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • BJP
  • PM Narendra Modi
  • pruthviraj chavhan

संबंधित बातम्या

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन
1

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन

मोदींच्या २५ वर्षांच्या प्रवासाची रंगमंचावर गाथा; ‘हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल; रविंद्र चव्हाणांचा मोठा दावा
2

मोदींच्या २५ वर्षांच्या प्रवासाची रंगमंचावर गाथा; ‘हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल; रविंद्र चव्हाणांचा मोठा दावा

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार
3

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल
4

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.