कर्णधार सूर्यकुमार टाॅसवेळी विसरला खेळाडूंची नावं (PhotoCredit - X)
IND vs OMA, Asia Cup 2025: आज आशिया कप २०२५ मधील शेवटच्या लीग सामन्यात भारतीय संघ ओमान सोबत भिडणार आहे. हा सामना अबु धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळवला जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या भारतीय संघाने गट टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करत, युएई आणि पाकिस्तानला पराभूत करून सुपर-४ मध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि ओमान दोघेही प्रत्येकी दोन बदलांसह मैदानात उतरले.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सूर्यकुमार यादवने सांगितले की, “आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहोत. या स्पर्धेत आम्ही अजून प्रथम फलंदाजी केली नाही आणि आम्हाला आमची फलंदाजीची खोली जाणून घ्यायची आहे. सुपर-४ मध्ये जाण्यापूर्वी खेळाडूंची तयारी होणे आवश्यक आहे.” प्लेइंग इलेव्हनमधील बदलांबाबत बोलताना सूर्यकुमार म्हणाला, “आम्ही दोन बदल केले आहेत. हर्षित आला आहे, अजून एक खेळाडू…” असे म्हणत त्याला दुसऱ्या खेळाडूचे नाव आठवले नाही. यावर हसत तो म्हणाला, “मी रोहित शर्मासारखा झालो आहे.” या विधानाने सर्वांनाच हसू आवरता आला नाही.
Looks like Rohit Sharma finally found a partner in crime 🤭 Surya joins the ‘forgetting names at toss’ club while announcing changes 🤣🔥
Surya Kumar Yadav : I Have become like Rohit Sharma (Laughs) pic.twitter.com/o2Y9ANQlh3
— 𝐕𝐢𝐡𝐚𝐚𝐧 (@TheRealPKFan) September 19, 2025
ओमानविरुद्धचा सामना टीम इंडियासाठी खूप खास आहे, कारण हा भारताचा २५० वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आहे. जागतिक क्रिकेटमध्ये हा टप्पा गाठणारा भारतीय संघ पाकिस्ताननंतर दुसरा संघ ठरला, ज्यांनी आतापर्यंत २७५ सामने खेळले आहेत. टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या २५० सामन्यांपैकी १६६ सामन्यांत विजय मिळवला असून, ७१ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Sunil Gavaskar: सुनिल गावस्करचा ‘सूर्य’ला खास सल्ला; ‘संजू-तिलकचा बॅटिंग ऑर्डर बदला, अन् बुमराहला…’
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिळक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव
ओमान (प्लेइंग इलेव्हन): आमिर कलीम, जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला (विकेटकीपर), शाह फैसल, जिक्रिया इस्लाम, आर्यन बिश्त, मोहम्मद नदीम, शकील अहमद, समय श्रीवास्तव, जितेन रामानंदी