पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) शनिवारी १३ ऑगस्ट रोजी त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. शोएब अख्तर त्याची गोलंदाजीची स्टाईल आणि वादामुळे क्रिकेट रसिकांमध्ये प्रसिद्ध झाला होता. त्याचा वेगपाहून त्याला रावलपिंडी एक्सप्रेस (Rawalpindi Express) या नावाने ओळखले जाऊ लागले होते.
शोएब अख्तरनं २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले असून नुकतीच त्यानं मेलबर्नमध्ये त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली आहे, यावेळी त्याने चाहत्यांना एक वाईट बातमी दिली आहे.
शोएब अख्तरचा जन्म १९७५ मध्ये पाकिस्तानच्या (Pakistan) रावलपिंडी (Rawalpindi) येथे झाला होता. शोएब अख्तरने त्याच्या वाढदिवसानिमित्त व्हिडिओद्वारे त्याच्या चाहत्यांनी संपर्क साधला. तसेच त्यावेळी त्याने गुडघ्याच्या शस्त्रक्रियेबद्दलही सांगितले. “शस्त्रक्रियेनंतर मला बरे वाटत आहे. हळूहळू माझ्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागला. मी आठ ते बारा आठवड्यात बरा होईल. पण आता मी फिरत आहे. मी आता कोणालाही भेटण्याच्या स्थितीत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. तुमची प्रार्थना आणि प्रेमामुळं लवकरात लवकर बरा होत आहे.” असे त्याने सांगितले. परंतु चाहत्यांशी संवाद साधताना त्याने एक वाईट बातमी देखील दिली. तो म्हणाला, “मला पाच वर्षांनंतर माझा गुडघा पूर्णपणे बदलावा लागेल. बर्फ, वेदना आणि गोळ्या… गेल्या पाच-सहा दिवसांपासून माझ्या आयुष्यात हेच चालू आहे”, असंही शोएब अख्तरने म्हंटल. त्याच्या या अवस्थेवर चाहत्यांनी कमेंट्स द्वारे हळहळ व्यक्त केली आणि त्याची प्रकृती लवकर बारी व्हावी याबद्दल प्रार्थना केल्या.