Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाजिरवाण्या रेकॉर्डमध्ये Shreyas Iyer अव्वल! Team India च्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाची नोंद

Eng Beat Ind 3rd t 20 India biggest defeat under shreyas iyer captaincy: तिसऱ्या टी- २० सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला १२५ धावांनी धूळ चारली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पु्नहा एकदा लाजिरवाणा पराभव पत्कारावा लागला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 08, 2026 | 01:50 PM
photo - social media

photo - social media

Follow Us
Follow Us:
  • श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम
  • भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाची नोंद
  • इंग्लंडने टीम इंडियाला चारली धूळ
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही भारताला दारुण पराभव पत्करावा लागला. यजमान इंग्लंडने टीम इंडियाला १२५ धावांनी पराभूत केले. या विजयासह इंग्लंडला ५ सामन्याच्या मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी मिळाली. इंग्लंडने प्रथम फंलदाजी करत २०१ धावांचा डोंगर उभारला. लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय संघ केवळ ७६ धावांवर सर्वबाद झाला. या पराभवामुळे भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. जो टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघावर यापूर्वी कधीही लागला नव्हता.

१७ वर्षांत पहिल्यांदाच घडलं! Virat Kohli ला लग्नाची मागणी करणाऱ्या ‘त्या’ महिला क्रिकेटरने लॉर्ड्सवर रचला इतिहास

इंग्लंडने टीम इंडियाला चारली धूळ

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवात संथ झाली. अर्शदीप सिंगने एकही धाव न देता षटक टाकले आणि फिल सॉल्टला पूर्णपणे रोखून धरले. मात्र, दुसऱ्या टोकाकडून जॉस बटलरने झटपट ३६ धावा केल्या, पण युवा प्रिन्स यादवने अचूक यॉर्कर टाकून त्याला त्रिफळाचीत केले. त्यानंतर प्रिन्सने हॅरी ब्रुकला बाद केले. यानंतर,फिल सॉल्टने ताबडतोब फलंदाजी करत आणि ४४ चेंडूंमध्ये ७ चौकार व ३ षटकारांसह ७० धावांची धडाकेबाज खेळी केली. सॅम करनने अखेरीस २४ चेंडूंमध्ये नाबाद ४१ धावांची वेगवान खेळी करून इंग्लंडला २०१ धावांच्या विशाल धावसंख्येपर्यंत पोहोचवले. भारताकडून प्रिन्स यादव आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले.

२०२ धावांच्या विशाल लक्ष्यासमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर एकाही भारतीय फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहता आले नाही. जोफ्रा आर्चरच्या वेगामुळे आणि जोश टंगच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे संपूर्ण भारतीय संघ केवळ ७६ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडने हा सामना १२५ धावांनी जिंकला. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे.

अय्यरच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघ विजयासाठी आतुर

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत सुमारे १९० धावा केल्या होत्या. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, पण इंग्लंडने दुसरा सामना सहज जिंकला. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने २०० हून अधिक धावा केल्या पण संपूर्ण संघ केवळ ७६ धावाच करू शकला आणि ११.४ षटकांत सर्वबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीही भारतीय संघ सलग पाच सामने गमावलेले नाही.

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील भारताचा सर्वात मोठा पराभव

  • इंग्लंडकडून १२५ धावांनी पराभव (नॉटिंगहॅम, २०२६)
  • न्यूझीलंडकडून ८० धावांनी पराभव (वेलिंग्टन, २०१९)
  • दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी पराभव (अहमदाबाद, २०२६)
  • दक्षिण आफ्रिकेकडून ५१ धावांनी पराभव (चंदीगड, २०२५)
  • न्यूझीलंडकडून ५० धावांनी पराभव (विशाखापट्टणम, २०२६)
  • भारतीय संघाला सलग ५ सामन्यांमध्ये विजय मिळवता आलेला नाही.

आयर्लंडपासून सुरू झालली पराभवाची मालिका

पराभवांची ही मालिका आयर्लंडविरुद्धच्या मालिकेने सुरू झाली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयर्लंडचा दौरा केला. ते किमान मालिका तरी जिंकतील अशी मोठी अपेक्षा होती, पण त्यांना पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या सामन्यात संघ अत्यंत सावधगिरीने मैदानात उतरला, पण निकाल अनपेक्षित होता. सलग दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने मालिका आधीच गमावली होती. त्यानंतर, जेव्हा इंग्लंड मालिका सुरू झाली, तेव्हा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यातही सलग पराभव झाले. एकंदरीत, आता श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदावर आणि भारतीय संघाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

W, W, W, W! दासुन शनाकाचा ‘डबल हॅट-ट्रिक’ धमाका; ४ बॉलमध्ये ४ विकेट्स घेऊन फिरवला गमावलेला सामना

Web Title: Shreyas iyer captaincy india biggest defeat record t20 defeat vs england ind vs eng

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • IND vs ENG T-20 Match
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्यात भारताचा दारूण पराभव; सूर्यवंशी, ईशान, अय्यर सर्वच फेल
1

IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्यात भारताचा दारूण पराभव; सूर्यवंशी, ईशान, अय्यर सर्वच फेल

India vs England 3rd T20I LIVE Score: प्रिन्स यादव-हर्षित राणा जोडीचा धुमाकूळ, भारतासमोर इंग्लंडचे 202 धावांचे आव्हान
2

India vs England 3rd T20I LIVE Score: प्रिन्स यादव-हर्षित राणा जोडीचा धुमाकूळ, भारतासमोर इंग्लंडचे 202 धावांचे आव्हान

IND Vs ENG Live: आज जिंकावेच लागणार! श्रेयस अय्यरचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
3

IND Vs ENG Live: आज जिंकावेच लागणार! श्रेयस अय्यरचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

वाद पेटवला पण Suryakumar Yadav च्या ‘त्या’ पोस्टने सगळे चित्र स्पष्ट; म्हणाला, ‘मला भारतीय…’
4

वाद पेटवला पण Suryakumar Yadav च्या ‘त्या’ पोस्टने सगळे चित्र स्पष्ट; म्हणाला, ‘मला भारतीय…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.