शुभमन गिल झाला २७ वर्षांचा, जाणून घ्या लव्ह अफेअर्स (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
शुभमन गिलला क्रिकेटमध्ये पहिल्यांदा २०१८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेदरम्यान प्रसिद्धी मिळाली. शुभमनने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने एकूण ४१८ धावा केल्या. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय संघाला विजय मिळाला. त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
T20 League: शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! श्वास रोखणारा सामना, शुभमन गिलची टीम 1 धावेने जिंकली
१९ वर्षांखालील विश्वचषकातील यशानंतर, २०१९ मध्ये शुभमन गिलची वरिष्ठ संघात निवड झाली. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पुढच्याच वर्षी त्याने कसोटी पदार्पण केले आणि आता तो दोन्ही संघांचे कर्णधारपद भूषवत आहे. शुभमन एक उत्तम खेळाडू असून त्याने फारच कमी वयात प्रसिद्धी मिळवली आणि आपल्या खेळाने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे.
जसजसे शुभमनचे क्रिकेटच्या मैदानावरचे यश वाढत गेले, तसतसा त्याचा चाहतावर्गही वाढला. यासोबतच, त्याच्या प्रेमप्रकरणांच्या अफवाही पसरू लागल्या. शुभमनच्या वाढदिवसानिमित्त, चला त्याच्या काही प्रसिद्ध प्रेमप्रकरणांवर एक नजर टाकूया.
शुभमनच्या प्रेमप्रकरणांबद्दल बोलायचे झाल्यास, या यादीतील पहिले नाव आहे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर. बऱ्याच काळापासून, मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात होते की शुभमन आणि सारा एकमेकांना डेट करत आहेत, परंतु त्यांनी कधीही उघडपणे आपले नाते मान्य केले नाही. मात्र अनेक ठिकाणी दोघांना एकत्र पाहिले गेले आहे. अगदी यावर्षी झालेल्या विम्बल्डनमध्येही सचिन तेंडुलकरच्या पूर्ण कुटुंबासह शुभमन एकत्र दिसला होता आणि पुन्हा एकदा तेंडुलकरांचा ‘जावई’ अशा अफवांना सुरूवात झाली होती.
IND vs SL: आई शपथ! शुभमन गिलचा हवेत कॅच! क्षणात श्रीलंकेच्या खेळाडूचे धाबे दणाणले
सारा तेंडुलकर व्यतिरिक्त, शुभमनचे नाव बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबतही जोडले गेले आहे. ते एकदा विमानतळावर एकत्र दिसले होते, परंतु साराने स्वतः पुढे येऊन शुभमनसोबतच्या तिच्या भेटीबद्दलचे सत्य स्पष्ट केले आणि त्यांच्यात काहीही नसल्याचे सांगितले.
सारा अली खान व्यतिरिक्त, शुभमनचे नाव अभिनेत्री अवनीत कौरसोबतही जोडले गेले आहे. सोशल मीडियावर त्या दोघांबद्दल बरीच चर्चा झाली आहे, परंतु कोणीही त्यांचे नाते अधिकृतपणे स्वीकारलेले नाही. शुभमनने या कोणत्याही अटकळींना कधीच हवा दिली नाही. मात्र एका मुलाखतीमध्ये त्याने सारा तेंडुलकर ही माझी अगदी जवळची मैत्रीण असल्याची कबुली याचवर्षी दिली होती.






