कार्लोस अल्काराज(फोटो-सोशल मीडिया)
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन २०२५ च्या प्री-क्वार्टरफायनल सामन्यात अँलेक्स डी मिनौरला हरवून क्वार्टरफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. त्यानंतर, कार्लोस अल्काराजने देखील आपला चांगला खेळ दाखवत ८ जुलै रोजी क्वार्टरफायनलमध्ये ब्रिटनच्या कॅमेरॉन नॉरीला सरळ सेटमध्ये हरवून सेमीफायनलचे तिकीट मिळवले आहे.
या विजयाने विम्बल्डन २०२५ मधील गतविजेता अल्काराजने सलग तिसऱ्यांदा हे जेतेपद जिंकण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. कार्लोस अल्काराज आणि कॅमेरॉन ग्रीन यांच्यातील हा टेनिस सामना एकूण ३ तास खेळला गेला. परंतु संपूर्ण सामन्यात कार्लोसने प्रतिस्पर्ध्यावर आपला दबदबा कायम राखला. अल्काराजने पहिला सेट ६-२ असा जिंकला. त्यानंतर, पुढील दोन सेटमध्ये, त्याने ग्रीनचा ६-३ आणि ६-३ असा पराभव करून स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला.
यानंतर सेमीफायनलमध्ये अल्काराज अमेरिकन खेळाडू टेलर फ्रिट्झसोबत भिडणार आहे. एक विशेष म्हणजे अमेरिकन खेळाडू टेलर फ्रिट्झ पहिल्यांदाच विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. जर कार्लोस अल्काराजबद्दल सांगायचे झाले तर, त्याने यापूर्वी २०२३ आणि २०२४ मध्ये विम्बल्डन पुरुष एकेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. या दरम्यान, त्याने स्टार खेळाडू नोवाक जोकोविचलाही पराभूत केले होते.
अमेरिकन टेनिसपटू टेलर फ्रिट्झने क्वार्टरफायनल सामन्यात करेन खाचानोव्हचा ६-३, ६-४ आणि ७-६ (४) असा पराभव करून सेमीफायनलचे टिकीत मिळवले. यापूर्वी, नोवाक जोकोविचने स्पर्धेच्या क्वार्टरफायनलमध्ये स्थान पटकावले. सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच २०२५ मध्ये विम्बल्डनचे विजेतेपदाच्या शर्यतीत असून मुख्य दावेदार आहे. प्री-क्वार्टरफायनल सामन्यात त्याने अॅलेक्स डी मिन्होचा ३-१ अशा फरकाने पराभव करून क्वार्टरफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले.
हेही वाचा : ‘लाखो रुपयांसह आयफोन उधार..’, लैंगिक शोषणाच्या आरोपांवर यश दयालने सोडले मौन, केला मोठा खुलासा
नोवाक जोकोविच आज म्हणजेच ९ जुलै रोजी सामना असणार आहे. हा सामना सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ०७:३० वाजता सुरू होणार आहे. नोवाक जोकोविचने विम्बल्डन २०२५ मध्ये शानदार कामगिरी करत आहे. आता तो त्याच्या कारकिर्दीत १६ व्यांदा क्वार्टरफायनलमध्ये पोहोचणारा खेळाडू ठरला आहे. सध्या जोकोविच ३८ वर्षांचा असून तो जागतिक टेनिस क्रमवारीत ६ व्या स्थानी आहे.