भारत वि पाकिस्तान सामाना(फोटो-सोशल मीडिया)
India vs Pakistan match tickets go on sale : आशिया कप २०२५ या स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा थरार २८ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय १५ सदस्यीय संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत शुभमन गिल उपकर्णधार असणार आहे. या वेळी आशिया कप हा टी२० स्वरूपात खेळला जाणार आहे. या स्पर्धेत आशियातील ८ संघ सहभागी होत आहेत. आशिया कपसाठी, आशियाई क्रिकेट परिषदेकडून सामन्यांसाठी तिकिट बुक करण्यासाठी एक पोर्टल सुरू करण्यात आली आहे.
आशिया कप दरम्यान, १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने या रोमांचक सामन्यासाठी तिकीट पोर्टल ओपन करण्यात आले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या प्रेस निवेदनात असे सांगितले आहे की, चाहते प्लॅटिनम यादीतून तिकिटे खरेदी करताना काही खास ऑफरचा लाभ घेऊ शकणार आहेत. या नवीन ऑफर्समध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारच्या तिकीट पॅकेजेसचा समावेश केला गेला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेकडून तीन प्रकारच्या तिकीट पॅकेजेसची माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये चाहते हवे ते पॅकेज खरेदी करू शकतात.
हेही वाचा : ICC ODI Team Rankings : एकदिवसीय सामन्यांमध्ये भारत अव्वल स्थानी, तर इंग्लंडवर ओढवली मोठी नामुष्की..
हेही वाचा : BCCI कडून Virat Kohli ला झुकते माप? लंडनमध्ये पास केली फिटनेस टेस्ट; भारतीय क्रिकेट जगतात गोंधळ
पुढील काही दिवसांमध्ये तिकिटे ऑफलाइन देखील खरेदी करण्यास उपलब्ध होणार आहेत. चाहते दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबीसाठी थेट तिकिटे खरेदी करू शकणार आहेत. याची संपूर्ण माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.