महेंद्रसिंग धोनी आणि स्टीफन फ्लेमिंग(फोटो-सोशल मिडिया)
SRH vs CSK : काल (२४ एप्रिल) आयपीएलच्या ४३ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला सनरायर्स हैदराबादने पराभवाची धूळ चारली आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात हैद्राबादने दबदबा राखात चेन्नईचा पराभव केला. हैद्राबादच्या संघाकडून नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रतिउत्तरात हैदराबादने हे लक्ष्य १९ व्या षटकात पूर्ण केले. आयपीएल २०२५ चा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी खूप वाईट ठरला आहे. चेन्नई संघाला ९ पैकी ७ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडल्यात जमा आहे. एसआरएचविरुद्धच्या पराभवानंतर, चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाले की ‘लिलावादरम्यान आमच्याकडून काही चुका झाल्या आहेत, ज्यामुळे नेमके संघ संयोजन तयार होण्यास अडचण निर्माण झाली.’
चेन्नई सुपर किंग्जच्या सततच्या पराभवामुळे अस्वस्थ झालेले मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी कबुली दिलीय आहे. ते म्हणाले की, केले की कदाचित काही महिन्यांपूर्वी मेगा लिलावात त्यांच्याकडून काही चुका झाल्या असणार, ज्यामुळे ते योग्य संघ संयोजन तयार करण्यास अपयशी ठरले. पाच वेळा चॅम्पियन चेन्नई संघासाठी आयपीएलच्या चालू हंगामात मात्र खूप परिस्थितीला सामोरे जावे लागले.
हेही : RCB विरुद्धच्या पराभवाचे दु:ख सहन होईना! आरआरचे CEO पोहचले थेट दारूच्या दुकानात, VIDEO VIRAL
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर फ्लेमिंग पत्रकार परिषदेला समोरे गेले. त्यावेळी ते म्हणाले की, हे सांगणे कठीण आहे. आम्ही केलेल्या कामगिरीमध्ये आम्हाला टि योग्यच वाटली. म्हणून आम्ही आमच्या खेळण्याच्या शैलीबाबत सविस्तर विचार करत आहोत. तसेच, आम्ही पाहत आहोत की खेळ कसा विकसित होत चालला आहे. त्याच्याशी जुळवून घेणे सोपे नाही. म्हणूनच आम्हाला आमच्या कामगिरीवर अभिमान आहे, कारण आम्ही आमच्या कामगिरीत खूप काळ सातत्य राखू शकलो आहोत.
फ्लेमिंगने यांनी कबूल केले की, त्यांच्या संघाकडून काही चुका झाल्या आहेत. ज्याचा मेगा लिलावाशी देखील संबंध आहे. इतर संघ आमच्यापेक्षा चांगले खेळत आहे आणि इथेच लिलावाचा मुद्दा पुढे येतो. आम्हाला त्यात दुरुस्ती करता आली नाही. म्हणून तुम्हाला आता प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. लिलाव हा काही सोपा खेळ नाही. ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारे असे आहे. परंतु तरीही मला वाटते की, तेव्हा आम्ही एक चांगला संघ निवडला होता.