गूल फिरोजा(फोटो-सोशल मिडिया)
Pahalgam Terrorist Attack : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ हा भारतात आयोजित होणार आहे. ही विश्वचषक स्पर्धा सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ साठी पाकिस्तान महिला क्रिकेट संघ पात्र ठरला आहे. ही स्पर्धा आता हायब्रिड मॉडेलवर खेळवली जाईल. याबाबत बोलताना पाकिस्तानची स्टार विकेटकीपर गुल फिरोजाने भारताविषयी गरळ ओकली आहे. फिरोजा म्हणाली की, तिच्या संघाला भारतात जाऊन खेळण्यात कसलाही रस नाही. तसेच तिला आधीच माहित आहे की तिचे विश्वचषक सामने हे आशियाई परिस्थितीत होणार असून भारतात नाहीत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान या दोन देशातील तनाव वाढला आहे. या तानावाचा परिणाम आता आंतरराष्ट्रीय संबंधासोबतच खेळांवर देखील होत आहे. पाकिस्तानची विकेटकीपर म्हणाली आहे की, तिचा संघ भारतात खेळण्यास तयार नाही. फिरोजाने पाकपॅशनशी बोलताना म्हटले की, आम्हाला इतकेच माहित आहे की आम्ही फक्त आशियाई परिस्थितीत खेळणार आहोत, पण भारतात नाही. हे खूप स्पष्ट आहे आणि आम्हाला भारतात खेळण्यात कुठलाही रस नाही.
हेही वाचा : RCB विरुद्धच्या पराभवाचे दु:ख सहन होईना! आरआरचे CEO पोहचले थेट दारूच्या दुकानात, VIDEO VIRAL
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने नुकतेच घरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या पात्रता सामन्यांमधील सर्वच्या सर्व पाच सामने जिंकून विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यात यश प्राप्त केले आहे. फिरोजा म्हणाली, की पात्रता सामने घरच्या मैदानावर असल्याने आणि सपोर्ट स्टाफकडून त्यानुसारच ट्रॅक तयार करण्यात आले होते. विश्वचषक सामने श्रीलंका किंवा दुबईसारख्या मैदानांवर होणार असल्याची आशा आहे, जिथे परिस्थिती आशियासारखीच असणार आहे.
“We’re not going to India.”
Pakistan opener Gull Feroza firmly states that the team won’t play in India.
🎙️ Catch the full post-qualification chat with Gull and others:
https://t.co/8HjU8lTI0R pic.twitter.com/ZqRGxHRbtx— PakPassion.net (@PakPassion) April 24, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावात वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून हायब्रिड मॉडेल लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत, पुढील दोन वर्षांसाठी, जर कोणताही देश बहुराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करत सेल आणि विरोधी देश तेथे जाण्यास तयार होत नसेल, तर त्याचे सामने त्रयस्थ ठिकाणी (हायब्रिड मॉडेल) आयोजित करण्यात येणार आहेत.
दोन महिन्यांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र, भारताने सुरक्षतेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारटताचे सर्व सामने हे दुबईमध्ये खेळवण्यात आले होते. आता त्याच धर्तीवर, पाकिस्तान महिला संघाने देखील भारतात विश्वचषक खेळण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहन नक्वी यांनी म्हटले आहे की, ज्याप्रमाणे भारत पाकिस्तानमध्ये येऊन खेळला नाही आणि तटस्थ ठिकाणी सामने खेळला, त्याचप्रमाणे आम्ही देखील त्याच सूत्रानुसार खेळणार आहोत. जेव्हा करार झाला आहे, तर तो अंमलात आणला पाहिजे. असे त्यांनी म्हटले आहे.