सध्या बांग्लादेश (Bangladesh) येथे महिला आशिया चषक (Womens Asia Cup) सामने खेळवले जात आहेत. काल श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (Shri Lanka Vs Pakistan) यांच्या महिला संघांमध्ये दुसरा सेमीफायनल सामना खेळवण्यात आला. या सामन्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत श्रीलंकेने अवघ्या एका धावाने पाकिस्तानवर विजय मिळवला. या विजयानंतर श्रीलंकेचा महिला संघ फायनलमध्ये दाखल झाला असून तेथे त्यांचा मुकाबला भारतीय महिला संघाशी होणार आहे.
सेमीफायनाचा दुसरा सामना सेल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आला होता. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाची कर्णधार चमारी अटापट्टूनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघानं निर्धारित २० षटकांत ६ विकेट्स गमावून १२२ धावा केल्या. श्रीलंकेकडून हर्षिता मडवीनं ३५, अनुष्का संजीवनीनं २६, निलाक्षी डी सिल्वानं १४आणि हसिनी परेरानं १३ धावा केल्या. कर्णधार चमारी अटापट्टूनं १० धावा केल्या. पाकिस्तानकडून नशरा संधूनं तीन विकेट्स घेतल्या आहेत. सादिया इक्बाल, निदा दार आणि आयमान अन्वर यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
१२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान महिला संघाला ६ विकेट्स गमावत फक्त १२१ धावाच करू शकला. त्यामुळे श्रीलंका संघानं हा सामना एक धावेनं जिंकत अंतिम सामन्यात पोहोचण्याचा मान मिळवला. पाकिस्तानच्या डावातील १८ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कर्णधार बिस्माह मारूफ ४२ धावांवर बाद सामन्यात मोठा ट्विस्ट आला. त्यानंतर १९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरही पाकिस्ताननं आणखी एक विकेट्स गमावली. अखरेच्या चेंडूवर तीन धावांची आवश्यकता असताना निदा दार फक्त एक धाव घेऊ शकली आणि रनआऊट झाली. त्यामुळे पक्षितांच्या संघाला पराभवाची चव चाखावी लागली.
महिला आशिया चषकातील अंतिम सामना श्रीलंका विरुद्ध भारत (Shri Lanka Vs India) असा रंगणार आहे. संघ शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी रंगणार असून महिला आशिया चषक २०२२ वर कोण नाव कोरत हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.






