Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Sooryavanshi: ‘तो आला, भांडला, मारले आणि जाळून टाकले’, वैभव सूर्यवंशीचा श्रीलंकेत दबदबा, चाहता कॅमेऱ्यासमोरच….

श्रीलंकेविरुद्धच्या त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने २९ चेंडूंमध्ये ९४ धावांची स्फोटक खेळी केली. सामन्यानंतर एका श्रीलंकन ​​चाहत्याचा व्हिडिओ समोर आला असून व्हायरल झाला आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 22, 2026 | 11:06 AM
वैभव सूर्यवंशीचा श्रीलंकेतील चाहत्यांवर प्रभाव (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

वैभव सूर्यवंशीचा श्रीलंकेतील चाहत्यांवर प्रभाव (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीने फायनलमध्ये श्रीलंकेला धुतले
  • श्रीलंकन चाहत्याचा व्हिडिओ झाला व्हायरल
  • काय म्हणाला वैभव सूर्यवंशीबद्दल जाणून घ्या 
Tri Series मालिकेच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने ज्या प्रकारे श्रीलंकन ​​संघाला धूळ चारली, ते अनेक दशके स्मरणात राहील. या १५ वर्षीय खेळाडूने सिद्ध केले की, व्यासपीठ जितके मोठे, तितकाच त्याच्या बॅटचा फटका अधिक शक्तिशाली असतो. अवघ्या २९ चेंडूंमध्ये ९४ धावांची खेळी करून वैभवने भारताला आनंद दिला आणि श्रीलंकेला खोलवर जखमी केले. दरम्यान, एका रडणाऱ्या श्रीलंकन ​​चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वैभव या मालिकेत काही काळ चाचपडत होता मात्र त्याने शेवटच्या सामन्यात कमालीची कामगिरी केली. दरम्यान १०० धावा वैभवच्या काही पूर्ण होत नाहीत याबाबत चाहत्यांचीही निराशा झाली आहे. अगदी जवळपास येऊन वैभव आऊट होताना दिसत आहे. मात्र मोक्याच्या क्षणी त्याने ९४ धावा काढत श्रीलंकन संघाला नेस्तनाबूत केले. वैभवच्या धावा आणि इतर खेळाडूंच्या खेळाने ३७८ धावांचा मोठा डोंगर भारताने उभा केला होता. 

IND A vs SL A: भारतीय युवा ब्रिगेडचा धमाका! फायनलमध्ये श्रीलंकेला लोळवले; ६६ धावांनी फायनल जिंकत तिरंगी मालिकेचे विजेतेपद पटकावले

श्रीलंकन ​​चाहत्याचा व्हिडिओ समोर आला

Leaked Instagram Live of Srilanka Fan. “Aagya , Jhagra Kiya , mar dia, jala dia..
Inshort Lanka laga dia.” pic.twitter.com/yCJKwE9LqJ
— Sunil Gavaskar (@virender_swag) June 21, 2026

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, वैभव सूर्यवंशी डगआऊटमध्ये बसलेला दिसत आहे. एक श्रीलंकन ​​चाहता त्याच्याकडे पाहत आहे. विशेष म्हणजे, या माणसाला हिंदीसुद्धा येते. कॅमेऱ्यासमोर रडत असलेला तो चाहता म्हणतो, “तो आला, लढला, मारलं, जाळलं.” हे शब्द उच्चारताना त्याच्या चेहऱ्यावरचे अश्रू स्पष्ट दिसत आहेत. दरम्यान, परिस्थितीची जाणीव नसलेला वैभव सूर्यवंशी एका सहकारी खेळाडूशी बोलत आहे. हा व्हिडिओ भारतीय युजर्सकडून मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे. यावरून सूर्यवंशीच्या खेळीचा प्रभाव दिसून येतो.

वैभवच्या खेळीमुळे भारत चॅम्पियन बनला

वैभव सूर्यवंशीच्या २९ चेंडूंतील ९४ धावांनी अंतिम सामना एकतर्फी बनवला. त्याच्यानंतर तिलक वर्मा (६७), ऋतुराज गायकवाड (४०) आणि अनुकूल रॉय (३९) यांनी भारतीय संघाला ३७७ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली. प्रत्युत्तरात, श्रीलंकेचा संघ आपली पूर्ण ५० षटके न खेळताच ३११ धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे, भारताने ६६ धावांच्या मोठ्या फरकाने त्रिकोणीय मालिका जिंकली.

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला

वैभव सूर्यवंशी कधी मैदानात दिसणार?

तसेच, वैभव सूर्यवंशी आता भारत विरुद्ध आयर्लंड टी-२० मालिकेत खेळताना दिसू शकतो. ही दोन सामन्यांची मालिका २६ जूनपासून सुरू होणार आहे. जर वैभवला पदार्पणाची संधी मिळाली, तर तो भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण पदार्पण करणारा खेळाडू ठरेल. वैभवची या दौऱ्यासाठी निवड झाली आहे. मात्र वैभव खेळणार की नाही हे अजून समोर आले नाही आणि जर खेळणार असेल तर चाहत्यांना पुढील ४ दिवसात वैभवची खेळी दिसून येईल. 

Web Title: Sri lanka fan reaction on vaibhav sooryavanshi innings in tri series video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • indian cricket team
  • Sri Lanka
  • Tri Series
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND Vs SL: पंत अन् जयस्वालने लाज घालवली; मात्र Devdatt Padikkal ने…, भारताचा स्कोअर किती?
1

IND Vs SL: पंत अन् जयस्वालने लाज घालवली; मात्र Devdatt Padikkal ने…, भारताचा स्कोअर किती?

IND vs SL: युवा श्रीलंकेने काढली भारताची लाज; पहिल्याच दिवशी चोपल्या ३६३ धावा, टीम इंडिया फ्लॉप
2

IND vs SL: युवा श्रीलंकेने काढली भारताची लाज; पहिल्याच दिवशी चोपल्या ३६३ धावा, टीम इंडिया फ्लॉप

WTC Final: श्रीलंकेत किती सामने खेळावे आणि जिंकावे लागणार? भारतासाठी WTC चं गणित नक्की आहे तरी कसं
3

WTC Final: श्रीलंकेत किती सामने खेळावे आणि जिंकावे लागणार? भारतासाठी WTC चं गणित नक्की आहे तरी कसं

IND vs SL: गिल-युगाची सुरुवात! श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाची पहिली कसोटी परीक्षा; कधी आणि कुठे पाहाल सराव सामना?
4

IND vs SL: गिल-युगाची सुरुवात! श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाची पहिली कसोटी परीक्षा; कधी आणि कुठे पाहाल सराव सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.