फोटो सौजन्य - X
श्रीलंका महिला संघ : सध्या आयपीएल २०२५ चा १८ वा सिझन सुरु आहे, त्यामुळे सर्व क्रिकेट चाहते इंडियन प्रीमियर लीग पाहण्यात व्यस्त आहेत. आयपीएल आधी महिला प्रीमियर लीग पार पडला. यामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने आणखी एकदा WPL च्या तिसऱ्या सीझनमध्ये बाजी मारली आहे. आता भारताचा महिला संघ तिरंगी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारताचा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर असणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेसोबत होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी श्रीलंकेने १७ सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. युवा फिरकी गोलंदाज मल्की मदाराला पहिल्यांदाच एकदिवसीय संघात बोलावण्यात आले आहे. किवी संघाविरुद्धच्या टी-२० मालिकेत मदाराची कामगिरी उत्कृष्ट होती आणि त्यामुळेच तो आता ५० षटकांच्या फॉरमॅटमध्येही दाखल झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळणाऱ्या श्रीलंकेच्या संघात एकूण आठ बदल करण्यात आले आहेत. ही मालिका २७ एप्रिलपासून सुरू होणार आहे.
Sri Lanka have unveiled a 17-player squad for their upcoming tri-series against India and South Africa 👀
Details 👇https://t.co/nDkVFuoo0d
— ICC (@ICC) April 23, 2025
श्रीलंकेच्या भूमीवर खेळवल्या जाणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाची कमान चामारी अटापट्टूकडे सोपवण्यात आली आहे. विश्मी गुणरत्ने, निलाक्षी डी सिल्वा, हसिनी परेरा यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत श्रीलंकेची कामगिरी निराशाजनक होती आणि एकदिवसीय मालिकेत संघाला २-० ने पराभव स्वीकारावा लागला. यामुळेच संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. श्रीलंका २७ एप्रिल रोजी टीम इंडियाविरुद्ध मालिकेला सुरुवात करेल. यावर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे.+
रिषभ पंत आणि जहीर खानमध्ये चालू सामन्यात बाचाबाची, LSG डगआउटमधील व्हिडिओने उडवली खळबळ
तिरंगी मालिका २७ एप्रिलपासून सुरू होईल आणि पहिल्या सामन्यात हरमनप्रीत आणि कंपनी श्रीलंकेचा सामना करतील. यानंतर, दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया २९ एप्रिल रोजी दक्षिण आफ्रिकेशी सामना करेल. श्रीलंकेचा सामना २ मे रोजी दक्षिण आफ्रिकेशी होईल. या मालिकेत एकूण ६ सामने खेळले जातील आणि अव्वल दोन संघ ११ मे रोजी होणाऱ्या जेतेपदाच्या सामन्यात खेळतील.
चमारी अथापथु (कर्णधार), विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षी सिल्वा, कविशा दिलहारी, अनुष्का संजीवनी, हसिनी परेरा, पियुमी वाथ्सला, मनुडी नानायककारा, देउमी विहंगा, इनोका रणवीरा, इनोशी फर्नांडो, मदकारावान, हंसिमा रविक्रमा, मद्दिमा, मल्कारा, सेविका सुगंधिका कुमारी, अचीनी कुलसूरिया