Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suryakumar Yadav: हिटमॅनचा प्रभाव! कर्णधार सूर्यकुमार टाॅसवेळी विसरला खेळाडूंची नावं, म्हणाला- ‘मी रोहितसारखा झालोय…’

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या भारतीय संघाने गट टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करत, युएई आणि पाकिस्तानला पराभूत करून सुपर-४ मध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 19, 2025 | 09:05 PM
कर्णधार सूर्यकुमार टाॅसवेळी विसरला खेळाडूंची नावं (PhotoCredit - X)

कर्णधार सूर्यकुमार टाॅसवेळी विसरला खेळाडूंची नावं (PhotoCredit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • कर्णधार सूर्यकुमार टाॅसवेळी विसरला खेळाडूंची नावं
  • टीम इंडियाचा २५० वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना
  • पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

IND vs OMA, Asia Cup 2025: आज आशिया कप २०२५ मधील शेवटच्या लीग सामन्यात भारतीय संघ ओमान सोबत भिडणार आहे. हा सामना अबु धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळवला जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या भारतीय संघाने गट टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करत, युएई आणि पाकिस्तानला पराभूत करून सुपर-४ मध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि ओमान दोघेही प्रत्येकी दोन बदलांसह मैदानात उतरले.

सूर्यकुमार टाॅसवेळी विसरला खेळाडूंची नावं

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सूर्यकुमार यादवने सांगितले की, “आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहोत. या स्पर्धेत आम्ही अजून प्रथम फलंदाजी केली नाही आणि आम्हाला आमची फलंदाजीची खोली जाणून घ्यायची आहे. सुपर-४ मध्ये जाण्यापूर्वी खेळाडूंची तयारी होणे आवश्यक आहे.” प्लेइंग इलेव्हनमधील बदलांबाबत बोलताना सूर्यकुमार म्हणाला, “आम्ही दोन बदल केले आहेत. हर्षित आला आहे, अजून एक खेळाडू…” असे म्हणत त्याला दुसऱ्या खेळाडूचे नाव आठवले नाही. यावर हसत तो म्हणाला, “मी रोहित शर्मासारखा झालो आहे.” या विधानाने सर्वांनाच हसू आवरता आला नाही.

Looks like Rohit Sharma finally found a partner in crime 🤭 Surya joins the ‘forgetting names at toss’ club while announcing changes 🤣🔥 Surya Kumar Yadav : I Have become like Rohit Sharma (Laughs) pic.twitter.com/o2Y9ANQlh3 — 𝐕𝐢𝐡𝐚𝐚𝐧 (@TheRealPKFan) September 19, 2025

टीम इंडियाचा २५० वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना

ओमानविरुद्धचा सामना टीम इंडियासाठी खूप खास आहे, कारण हा भारताचा २५० वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आहे. जागतिक क्रिकेटमध्ये हा टप्पा गाठणारा भारतीय संघ पाकिस्ताननंतर दुसरा संघ ठरला, ज्यांनी आतापर्यंत २७५ सामने खेळले आहेत. टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या २५० सामन्यांपैकी १६६ सामन्यांत विजय मिळवला असून, ७१ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Sunil Gavaskar: सुनिल गावस्करचा ‘सूर्य’ला खास सल्ला; ‘संजू-तिलकचा बॅटिंग ऑर्डर बदला, अन् बुमराहला…’

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिळक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव

ओमान (प्लेइंग इलेव्हन): आमिर कलीम, जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला (विकेटकीपर), शाह फैसल, जिक्रिया इस्लाम, आर्यन बिश्त, मोहम्मद नदीम, शकील अहमद, समय श्रीवास्तव, जितेन रामानंदी

Web Title: Surya forgot names toss hitman influence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 09:05 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND vs OMA
  • Rohit Sharma
  • Suryakumar Yadav
  • Team India

संबंधित बातम्या

ICC चा ऐतिहासिक निर्णय! पुढील World Cup मध्ये मोठा बदल, सहभागी संघांच्या संख्येत वाढ
1

ICC चा ऐतिहासिक निर्णय! पुढील World Cup मध्ये मोठा बदल, सहभागी संघांच्या संख्येत वाढ

Supreme Court on Hasin Jahan: सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद शमीच्या पत्नीला फटकारले, हसीन जहाँ मोठ्या अडचणीत
2

Supreme Court on Hasin Jahan: सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद शमीच्या पत्नीला फटकारले, हसीन जहाँ मोठ्या अडचणीत

IND vs PAK : आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये होणार धमाकेदार सामना, ‘नो हँडशेक’ वाद कायम राहणार का?
3

IND vs PAK : आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये होणार धमाकेदार सामना, ‘नो हँडशेक’ वाद कायम राहणार का?

भारताकडून झालेल्या विश्वचषक उपांत्य फेरीत पराभवाचे दुःख एलिसा हिलीला सोसेणा! सोडले मौन, वाचा सविस्तर
4

भारताकडून झालेल्या विश्वचषक उपांत्य फेरीत पराभवाचे दुःख एलिसा हिलीला सोसेणा! सोडले मौन, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.