वानखेडे स्टेडियमचा पीच रिपोर्ट (फोटो- ai gemini)
वानखेडेवर रंगणार मुंबई विरुद्ध कोलकाताचा सामना
वानखेडेच्या पीच रिपोर्टने यदवली खळबळ
रोहित शर्मा विरुद्ध सुनील नारायण सामना रंगणार
Tata IPL 2026 MI vs KKR Live: आज मुंबईची पलटण थेट कोलकाता नाइट रायडर्सला (MI vs KKR) भिडणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे. रोहित शर्मा विरुद्ध सुनील नारायण असा (IPL 2026) सामना पाहायला मिळू शकतो. आतापर्यंतचा लीगमध्ये मुंबई इंडियन्सने 5 वेळेस तर कोलकाताने 3 वेळेस विजेतेपद पटकावले आहे. तर आज आपण वानखेडेचे पीच कोणाला मदत करणार, आज दोन्ही संघांमध्ये कोणते खेळाडू खेळताना दिसू शकतात हे पाहुयात.
मुंबईकडून रोहित शर्मा ओपन करताना पाहायला मिळेल. त्याच्यासोबत कोण ओपन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तीन नंबरला तिलक वर्मा खेळण्यास येऊ शकतो. चार नंबरला सूर्यकुमार यादव येऊ शकतो. तसेच हार्दिक पंड्या आणि नमन धीर यांच्याकडून संघाला चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. तर गोलंदाजी देखील मुंबईची चांगली स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.
कोलकाता नाइट रायडर्सकडे देखील चांगला समतोल पाहायला मिळत आहे. यंदा अजिंक्य रहाणे केकेआरचे नेतृत्व करत आहे. फीन एलनसह तो ओपन करू शकतो. तसेच त्यांची गोलंदाजी देखील सक्षम पाहायला मिळत आहे.
IPL 2026: रोहितसाठी KKR चा संघ म्हणजे ‘बदाम हलवा’! माजी निवडकर्त्याच्या ‘त्या’ दाव्याने खळबळ
कसे असणार वानखेडेचे पीच?
मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे फलंदाजीसाठी उत्तम समजले जाते. या स्टेडियमवर चौकार, षटकार जास्त प्रमाणात लगावले जातात. पहिल्यांदा फलंदाजी केल्यास इथे 180 पर्यंत स्कोअर झाला आहे. तर धावांचा पाठलाग करताना इथला रेकॉर्ड हा 158 इतका आहे. आज मुंबईतील वातावरण मोकळे राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे टॉस जिंकून कोणताही संघ फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
माजी निवडकर्त्याच्या ‘त्या’ दाव्याने खळबळ
रोहित शर्माबद्दल बोलताना कृष्णमाचारी श्रीकांत म्हणाले, “रोहित शर्मासाठी केकेआर म्हणजे अगदी बदाम हलव्यासारखी होती. रोहित शर्मा कोलकाताच्या गोलंदाजांचा मनसोक्त समाचार घ्यायचा. कोलकाताचा संघ समोर येताच रोहित शर्मा एकदम फॉर्म मध्ये असल्यासारखा खेळतो.” आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध कोलकाता यांच्यात सामना होणार आहे.
वानखेडेवर सन्नाटा! KKR विरुद्ध MI च्या संघाला ‘ग्रहण’; Bumrah अन् ‘या’ खेळाडूंशिवाय लढावे लागणार?
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर/अश्वनी कुमार, रदरफोर्ड, मिचेल सँटनर, विल जॅक्स
कोलकाता नाइट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार) आणि फिन्न ॲलन, अंगकृष रघुवंशी, कॅमेरॉन ग्रीन, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, भव अरोरा, वरुण चक्रवर्ती, उमरान मलिक आणि सुयश शर्मा (इम्पॅक्ट प्लेयर)






