Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशिया कपसाठी टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच! Dream11 नंतर कोण आहे नवा प्रायोजक? पहा पहिला लुक..

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघ प्रायोजकत्वाशिवाय खेळणार आहे. आशिया कपसाठी भारतीय संघाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली आहे. या जर्सीवर प्रयोजकाच्या जागी 'इंडिया' हे नाव असणार आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 06, 2025 | 08:30 PM
Team India's new jersey launched for Asia Cup! Who is the new sponsor after Dream11? See the first look..

Team India's new jersey launched for Asia Cup! Who is the new sponsor after Dream11? See the first look..

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय संघ आशिया कप 2025 स्पर्धेसाठी युएईमध्ये पोहचला आहे. तिथे भारतीय संघ सराव देखील करताना दिसून येत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. भारत १० सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. अशातच भारतीय संघाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आशिया कपपूर्वी बीसीसीआय आणि ड्रीम इलेव्हन यांच्यातील जर्सी प्रायोजकत्व करार संपुष्टात आला होता. त्यामुळे आता भारताला नवीन प्रायोजक शोधावा लागला,परंतु भारतीय संघाला कुणीच प्रायोजक मिळू शकला नाही. त्यामुळे आता भारतीय संघासाठी नवीन जर्सीवर लाँच करण्यात अली आहे. परंतु आता भारतीय संघाच्या या जर्सीवर केवळ ‘इंडिया’ हेच नाव आहे. टीम इंडिया आता आशिया कप स्पर्धेत प्रायोजकत्वाशिवाय खेळणार आहे. भारतीय संघाच्या नवीन जर्सीचा पहिला लूक समोर आला आहे.

हेही वाचा : सचिन, सेहवागसह ‘या’ दिग्गजांना बाहेरचा रस्ता! दिनेश कार्तिककडून India All-Time T20 Playing XI जाहीर

नवीन जर्सी कशी आहे?

भारतीय संघाच्या नवीन जर्सीवर डाव्या बाजूला बीसीसीआयचा लोगो असून उजव्या बाजूला डीपी वर्ल्ड आशिया कप 2025 असं लिहिलेलं दिसत आहे. डीपी वर्ल्ड हा आशिया कप 2025 चा प्रायोजक आहे. प्रायोजकाच्या मोकळ्या जागेवर आता ‘इंडिया’ हे नाव लिहिण्यात आले आहे. त्यामुळे टीम इंडियाला नवा प्रायोजक मिळाला नसून तो आता आशिया कप स्पर्धेनंतरच मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआय आणि ड्रीम 11 यांच्यात 2023 मध्ये करार करण्यात आला होता.  केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग सुधारणा 2025 मध्ये सुधारणा केल्यानंतर हा करार 6 महिन्याआधीच संपुष्टात आला.

🚨 THE ASIA CUP JERSEY OF TEAM INDIA 🚨 🇮🇳 pic.twitter.com/UVuIHEu5C9

— Johns. (@CricCrazyJohns) September 6, 2025

हेही वाचा : Asia cup 2025 : आशिया कपसाठी संघ व्यवस्थापन कुणाला देणार कौल? संजू सॅमसन की जितेश शर्मा? समोर आली मोठी अपडेट

‘हा’ असेल आगामी प्रायोजक..

भारताच्या किर्लोस्कर ग्रुप आणि जपानच्या टोयोटा मोटर कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त उपक्रम असलेल्या टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून भारतीय संघाचा मुख्य प्रायोजक बनण्यात रस दाखवल्याचे बोलले जात आहे.  दुसरीकडे, बीसीसीआयकडून जर्सी प्रायोजकासाठी 30 ते 40 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे.  या माध्यमातून बीसीसीआयला 400 कोटी अधिक कमाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तीन वर्षांसाठी नव्या प्रायोजकाला इतके पैसे मोजावे लागणार आहेत.  यामध्ये 2026 टी20 वर्ल्डकप, 2027 वनडे वर्लडकप आणि 130 सामन्यांमधून 400 कोटींहून अधिक रक्कम मिळण्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयकडून  16 सप्टेंबर रोजी टायटल स्पॉन्सरसाठी बोली लावण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

Web Title: Team india launches new jersey without sponsor for asia cup 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 08:29 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • bcci
  • Dream11
  • indian cricket team
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : आशिया कपसाठी संघ व्यवस्थापन कुणाला देणार कौल? संजू सॅमसन की जितेश शर्मा? समोर आली मोठी अपडेट 
1

Asia cup 2025 : आशिया कपसाठी संघ व्यवस्थापन कुणाला देणार कौल? संजू सॅमसन की जितेश शर्मा? समोर आली मोठी अपडेट 

अखेर BCCI च्या निवडणुकीची तारीख ठरली! ‘या’ पदांसाठी होणार निवडणुका..
2

अखेर BCCI च्या निवडणुकीची तारीख ठरली! ‘या’ पदांसाठी होणार निवडणुका..

BCCI कडून Shreyas Iyer ला मोठी भेट! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये वाहणार भारताची धुरा..
3

BCCI कडून Shreyas Iyer ला मोठी भेट! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये वाहणार भारताची धुरा..

PHOTO: भारताचा संघ आशिया कपसाठी सज्ज! कोणाला मिळणार Playing 11 मध्ये जागा?
4

PHOTO: भारताचा संघ आशिया कपसाठी सज्ज! कोणाला मिळणार Playing 11 मध्ये जागा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.