भारताचा संघाने झिम्बाम्ब्वेविरुद्ध ४-१ अशी मालिका जिंकली आहे. भारताच्या युवा खेळाडूंचा झिम्बाम्ब्वे दौरा कालपासून संपला आहे. या मालिकेसाठी कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आले होते. या मालिकेमध्ये भारताच्या खेळाडूंनी फक्त पहिला सामना गमावला होता, त्यानंतर सलग चार सामने जिंकून भारताने मालिका नावावर केली. त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. भारताच्या संघाने शेवटचा पाचवा सामना ४२ धावांनी जिंकून मालिका नावावर केली. यावेळी सोशल मीडियावर कर्णधार शुभमन गिलचे कौतुक केले जात आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने ४-१ अशी मालिका जिंकली आहे. फोटो सौजन्य - BCCI
T२० विश्वचषकामध्ये फायनलच्या सामन्यात महत्वाची खेळी खेळणारा शिवम दुबेने झिम्बाम्ब्वेविरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात दमदार कामगिरी केली आणि त्यांना सामनावीराचा मान देण्यात आला.
भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने त्याच्या करियरची सर्वात्तम गोलंदाजी शेवटच्या सामन्यामध्ये केली. यावेळी त्याने ३.३ ओव्हरमध्ये २२ रन देत ३ विकेट्स घेतल्या आहेत.
भारताचा उपकर्णधार संजू सॅमसनने ४५ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या आहेत, त्याच्या या खेळीने भारताच्या संघाला मजबूत स्थितीमध्ये उभे केले होते.
चेन्नई सुपर किंग्समधील वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे यांनी शेवटच्या सामन्यामध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली.
झिम्बाम्ब्वेविरुद्ध मालिका भारताची संपली आहे. यानंतर भारताचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये भारताचे ३ T२० सामने आणि ३एकदिवसीय सामने होणार आहेत.