बेन स्टोक्स आणि शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा ३३६ धावांनी धुव्वा उडवायला आहे. या विजयासह भारतीय संघाने इतिहास रचला आहे. त्यानंतर, एजबॅस्टनवरील विजयानंतर टीम इंडियाकडून चाहत्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळवण्यात येणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत, दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आले आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना १० जुलै २०२५ पासून सुरु होणार आहे. दोन्ही संघ यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत. परंतु लॉर्ड्सवरील टीम इंडियाचा रेकॉर्ड चाहत्यांना न ऐकावा असा राहिला आहे. येथे इंग्लंड संघाने भारतावर आपला दबदबा राखला आहे.
हेही वाचा : IND Vs END : सलामीवीर Jack Crowley चा फ्लॉप शो! इंग्लंडचा माजी कर्णधार वॉनने दिला गिलकडून शिकण्याचा सल्ला..
टीम इंडियाने आतापर्यंत लॉर्ड्सच्या मैदानावर एकूण १९ सामने खेळेलेले आहेत. या दरम्यान, टीम इंडिया फक्त ३ सामनेच जिंकला आहे. १२ सामन्यांमध्ये भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. तर ४ सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघाचा विक्रम भयावह राहिला आहे. आता शुभमन गिलच्या संघासमोर मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भूतकाळातील रेकॉर्ड बदलवण्याचे आव्हान असणार आहे.
आपण इंग्लंड संघाबद्दल सांगायचे झाल्यास या संघाने लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर एकूण १४५ कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्यांनी ५९ सामने आपल्या खिशात टाकले आहेत. त्याच वेळी, ३५ मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर एकूण ५१ सामने अनिर्णित राहिले आहेत. तिसरा कसोटी सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. तिसऱ्या सामन्यात भारताला विजय आवश्यक आहे अन्यथा या सामन्यातील पराभव टीम इंडियाला मालिकेत मागे टाकेल. अशा परिस्थितीत शुभमन कंपनी लॉर्ड्सवर उत्तम तयारीसह मैदानात उरणार आहे.
हेही वाचा : अरेरे…सामना सोडून इकडे कुठे? मॅचला दोन दिवस शिल्लक असताना ऋषभ पंत पोहोचला विम्बल्डनला
एजबॅस्टन कसोटीमध्ये, जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली आहे. या कसोटीत, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह यांनी मिळून या सामन्यात एकूण १७ बळी टिपले आहेत. त्या कसोटीत जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. आता तो पुन्हा लॉर्ड्समध्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार आहे.