ऋषिकेश बेळमकर मानकरी (फोटो- सोशल मिडिया)
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सचिन आपटे, प्राचार्य प्रा. डॉ. उगले, उल्हास त्रिमल, आदित्यनर्धन त्रिमल, जयपकाश भट यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. आशा लेंगळे यांनी केले व सूत्रसंचालन लक्ष्मण गावडे , कुशाबा पिंगळे यांनी केले. या स्पर्धेसाठी ज्ञानेश्वर वाझे, डॉ उमेश बिबवे, आदित्य गिरमे, निलेश वैद्य, प्रमोद मडावी, अभिजित किर्वे, मंथन जोरकर हे उपस्थित होते.
स्पर्धेचा वजन गट निहाय निकाल पुढील प्रमाणे (पहीले तीन क्रमांक) : ६० किलो ग्रॅम : अमय पंडित (इंदीरा विद्यापीठ), सर्वेश येनपुरे (गरवारे वाणिज्य महाविद्यालय), साई गावडे (केआरटी महाविद्यालय), ६० ते ६५ किलो : अक्षय ढेबे (झील महाविद्यालय), वेदांत मुरकुटे (नेस वाडीया महाविद्यालय), गौरव मदने (आएसके महाविद्यालय),
६५ ते ७० किलो : श्रेयस गवळी (सुर्यदत्ता महाविद्यालय), ओंकार माने (नवभारत महाविद्यालय), अमित चौगुले (वायसीएम महाविद्यालय), ७० ते ८० किलो : ऋषिकेश बेळमकर (स्वराज कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय), अजित तावडे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय), सुजल कन्ना (एच व्ही देसाई महाविद्यालय), ८० किलो वरील : आयुष रावत (सिम्बायोसिस नर्सिंग महाविद्यालय), मयूर पवार (एम. एस. काकडे महाविद्यालय), राज वीर (सिंहगड महाविद्यालय).
पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक
पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) वतीने तसेच बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली आयोजित सुशांत चिपलकट्टी यांच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँडप्रिक्स १९ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या एकेरीत मुंबईच्या देव रुपारेलिया याने, तर मुलींच्या एकेरीत दिल्लीच्या इशिता नेगी हिने विजेतेपद पटकावले.






