फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारतीय पॅरा ॲथलेटिक्स सध्या कमाल करताना दिसत आहेत. भारताच्या खात्यात तीन दिवसांमध्ये पाच मेडल नावावर केले आहेत. यामध्ये १ सुवर्ण, १ रौम्य आणि ३ कांस्यपदकांचा समावेश आहे. या पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मेडल टॅलीमध्ये वाढ होईल अशी भारतीय प्रेक्षकांची आशा आहे. आज चौथ्या दिनी भारताचे अनेक पॅरा ॲथलेटिक्स ॲक्शनमध्ये आहेत. यामध्ये भारताच्या तीन बॅडमिंटनपटू क्वार्टर फायनलमध्ये खेळल्या यामधील २ शटलर पॅरिस पॅरालिम्पिकच्या शर्यतीतून पराभूत झाल्या आहेत, तर मनीषा रामदास हिने जपानच्या पॅरा बॅडमिंटनपटूला पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मनीषा रामदासच्या या विजयासह भारताच्या बॅडमिंटपटूंनी दोन पदक पक्के केले आहेत.
आज भारताचे दोन पुरुष बॅडमिंटनपटू सेमीफायनलमध्ये आमनेसामने असणार आहेत, म्हणजेच एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. यामधील ज्या शटलरचा विजय होईल तो फायनल गाठेल आणि कमीतकमी सिल्वर मेडल पक्के करेल. त्याचबरोबर मनीषा रामदास हिने क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या पॅरा बॅडमिंटनपटूला पराभूत करून मेडल पक्के केले आहे. कारण महिला बॅडमिंटनमध्ये सुद्धा सेमीफायनलमध्ये भारताची शटलर तुलसीमथी मुरुगेसन हिच्यासोबत तिचा सामना होणार आहे. यामध्ये जो जिंकेल त्याचे मेडल पक्के होईल. पुरुष बॅडमिंटन वैयक्तिक स्पर्धेमध्ये सुकांत कदम आणि सुहास यथिराज यांच्यामध्ये सामना होणार आहे. तर महिला बॅडमिंटन वैयक्तिक स्पर्धेमध्ये सेमीफायनलचा सामना तुलसीमथी मुरुगेसन विरुद्ध मनीषा रामदास यांच्यात होणार आहे.
With this win , India has a medal assured now 👏 https://t.co/0PhB3VmMUN pic.twitter.com/up0utysLWO — The Khel India (@TheKhelIndia) September 1, 2024
21:50 – सुहास यथिराज विरुद्ध सुकांत कदम
02:00 नंतर – तुलसीमथी मुरुगेसन विरुद्ध मनीषा रामदास