वैभव सूर्यवंशीचा श्रीलंकेतील चाहत्यांवर प्रभाव (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
वैभव या मालिकेत काही काळ चाचपडत होता मात्र त्याने शेवटच्या सामन्यात कमालीची कामगिरी केली. दरम्यान १०० धावा वैभवच्या काही पूर्ण होत नाहीत याबाबत चाहत्यांचीही निराशा झाली आहे. अगदी जवळपास येऊन वैभव आऊट होताना दिसत आहे. मात्र मोक्याच्या क्षणी त्याने ९४ धावा काढत श्रीलंकन संघाला नेस्तनाबूत केले. वैभवच्या धावा आणि इतर खेळाडूंच्या खेळाने ३७८ धावांचा मोठा डोंगर भारताने उभा केला होता.
श्रीलंकन चाहत्याचा व्हिडिओ समोर आला
Leaked Instagram Live of Srilanka Fan. “Aagya , Jhagra Kiya , mar dia, jala dia..
Inshort Lanka laga dia.” pic.twitter.com/yCJKwE9LqJ — Sunil Gavaskar (@virender_swag) June 21, 2026
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, वैभव सूर्यवंशी डगआऊटमध्ये बसलेला दिसत आहे. एक श्रीलंकन चाहता त्याच्याकडे पाहत आहे. विशेष म्हणजे, या माणसाला हिंदीसुद्धा येते. कॅमेऱ्यासमोर रडत असलेला तो चाहता म्हणतो, “तो आला, लढला, मारलं, जाळलं.” हे शब्द उच्चारताना त्याच्या चेहऱ्यावरचे अश्रू स्पष्ट दिसत आहेत. दरम्यान, परिस्थितीची जाणीव नसलेला वैभव सूर्यवंशी एका सहकारी खेळाडूशी बोलत आहे. हा व्हिडिओ भारतीय युजर्सकडून मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे. यावरून सूर्यवंशीच्या खेळीचा प्रभाव दिसून येतो.
वैभवच्या खेळीमुळे भारत चॅम्पियन बनला
वैभव सूर्यवंशीच्या २९ चेंडूंतील ९४ धावांनी अंतिम सामना एकतर्फी बनवला. त्याच्यानंतर तिलक वर्मा (६७), ऋतुराज गायकवाड (४०) आणि अनुकूल रॉय (३९) यांनी भारतीय संघाला ३७७ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली. प्रत्युत्तरात, श्रीलंकेचा संघ आपली पूर्ण ५० षटके न खेळताच ३११ धावांवर सर्वबाद झाला. अशाप्रकारे, भारताने ६६ धावांच्या मोठ्या फरकाने त्रिकोणीय मालिका जिंकली.
वैभव सूर्यवंशी कधी मैदानात दिसणार?
तसेच, वैभव सूर्यवंशी आता भारत विरुद्ध आयर्लंड टी-२० मालिकेत खेळताना दिसू शकतो. ही दोन सामन्यांची मालिका २६ जूनपासून सुरू होणार आहे. जर वैभवला पदार्पणाची संधी मिळाली, तर तो भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण पदार्पण करणारा खेळाडू ठरेल. वैभवची या दौऱ्यासाठी निवड झाली आहे. मात्र वैभव खेळणार की नाही हे अजून समोर आले नाही आणि जर खेळणार असेल तर चाहत्यांना पुढील ४ दिवसात वैभवची खेळी दिसून येईल.






