Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडणार अवघ्या 15 व्या वर्षी Vaibhav Sooryavanshi, सर्वात लहान वयात पदार्पण करणारा खेळाडू

निवड समिती आयर्लंड दौऱ्यासाठीच्या संघात वैभव सूर्यवंशीचा समावेश करू शकते. जर त्याला संधी मिळाली, तर तो भारतासाठी खेळणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून महान सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 05, 2026 | 12:18 PM
वैभव सूर्यवंशी मोडणार सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - Instagram)

वैभव सूर्यवंशी मोडणार सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीचा भारतीय टीममध्ये समावेश होण्याची शक्यता 
  • आयर्लंडविरूद्ध करू शकतो भारतीय टीममधून पदार्पण 
  • सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड करू शकतो ब्रेक 
सध्या क्रिकेट विश्वात एकच नाव सतत गाजतंय आणि ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. केवळ वयाच्या १५ व्या वर्षात या मुलाने सर्वांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. प्रत्येकाला त्याच्या खेळाचे कौतुक आहे. दरम्यान भारतीय टीममध्ये वैभवचा समावेश करावा असं अनेकांनी सुचवलं आहे. वृत्तांवर विश्वास ठेवल्यास, वैभव सूर्यवंशी भारतीय क्रिकेट संघात निवडला जाणारा सर्वात तरुण खेळाडू ठरणार आहे. शुक्रवारपर्यंत, सूर्यवंशी १५ वर्षे आणि ७० दिवसांचा होता. ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, तो पुढील २० दिवसांत भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळू शकतो.

भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू सचिन तेंडुलकर आहे. त्याने १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध वयाच्या १६ वर्षे आणि २०५ दिवसांनी पदार्पण केले होते. वृत्तानुसार, BCCI खराब कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवून श्रेयस अय्यरला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त करू शकते. निवड समितीची बैठक शनिवारी होणार आहे. यामध्ये आयर्लंडविरूद्ध निवडल्या जाणाऱ्या टीममध्ये वैभव सूर्यवंशीचा समावेश होऊ शकतो. आयपीएल २०२६ मध्ये दणक्यात कामगिरी करून वैभवने आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. याशिवाय सर्वाधिक धावा करणाऱ्यासह ५ पुरस्काराचा मानकरीदेखील तो ठरला होता. 

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध कसोटी सामन्यात तिसऱ्या खेळाडूचे स्थान अजूनही पक्के नाही, साई की पडिक्कल कोण जिंकणार विश्वास

वैभवचा स्ट्राईक रेट 

वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये २३७.३० च्या स्ट्राइक रेटने ७७६ धावा करून उत्कृष्ट कामगिरी केली. हा १५ वर्षीय खेळाडू सध्या श्रीलंकेत होणाऱ्या भारत ‘अ’ संघाच्या तिरंगी मालिकेची तयारी करत आहे. या मालिकेत भारत आणि यजमान श्रीलंका, तसेच अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. ही मालिका ९ ते २१ जून दरम्यान खेळवली जाईल. त्यानंतर भारत २६ आणि २८ जून रोजी बेलफास्टमध्ये आयर्लंडविरुद्ध दोन टी२० सामने खेळेल, आणि त्यानंतर १ ते ११ जुलै दरम्यान इंग्लंडमध्ये पाच टी२० सामने खेळेल. आयर्लंड मालिकेसाठीच्या संघात सूर्यवंशीचा समावेश केला जाऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू

आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंचा विचार केल्यास, पाकिस्तानचा हसन रझा या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने १९९६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध वयाच्या अवघ्या १४ वर्षे आणि २२७ दिवसांनी कसोटी पदार्पण केले. एकदिवसीय सामन्यांमध्येही हा विक्रम रझाच्या नावावर आहे, त्याने वयाच्या १४ वर्षे आणि २३३ दिवसांनी आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला. रोमानियाच्या मारियान घेरासिमने वयाच्या अवघ्या १४ वर्षे आणि १६ दिवसांनी टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पण भारतीय खेळाडूंमध्ये हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. अजूनही कोणत्याही खेळाडूने हा विक्रम मोडलेला नाही. मात्र हा विक्रम कदाचित वैभव सूर्यवंशीच्या नावे होऊ शकतो. यासाठी काही काळ चाहत्यांना वाट पहावी लागणार आहे. 

IPL 2026: ‘700 धावा काढणार…’ वैभवने लिहून ठेवली होती ‘स्क्रिप्ट’; फोन नोट्स ते मैदानावरील तुफान, केला खुलासा

Web Title: Vaibhav sooryavanshi is set to become youngest indian player in indian team may break sachin tendulkar record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • indian cricket team
  • Sachin Tendulkar
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

निर्णय झाला! क्रिकेट क्षेत्रात BCCI चा मोठा डाव; Pragyan Ojha असणार Team India चा नवा चीफ सिलेक्टर
1

निर्णय झाला! क्रिकेट क्षेत्रात BCCI चा मोठा डाव; Pragyan Ojha असणार Team India चा नवा चीफ सिलेक्टर

IND vs NZ: सॅमसनच्या कमबॅकने वैभव सूर्यवंशीचे टेन्शन वाढलं; न्यूझीलंड दौऱ्यावरही संधी मिळणार नाही? श्रेयस अय्यरने दिले संकेत
2

IND vs NZ: सॅमसनच्या कमबॅकने वैभव सूर्यवंशीचे टेन्शन वाढलं; न्यूझीलंड दौऱ्यावरही संधी मिळणार नाही? श्रेयस अय्यरने दिले संकेत

BCCI उडवणार क्रिकेटविश्वात खळबळ! Ajit Agarkar यांच्या ठिकाणी ‘हा’ खेळाडू होणार चीफ सिलेक्टर?
3

BCCI उडवणार क्रिकेटविश्वात खळबळ! Ajit Agarkar यांच्या ठिकाणी ‘हा’ खेळाडू होणार चीफ सिलेक्टर?

IND vs WI: 4 सामन्यांपासून बाहेर Vaibhav Sooryavanshi, इन्स्टाग्रामवर दोन शब्दात भावना व्यक्त; चर्चेला उधाण
4

IND vs WI: 4 सामन्यांपासून बाहेर Vaibhav Sooryavanshi, इन्स्टाग्रामवर दोन शब्दात भावना व्यक्त; चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.