Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

15 वर्षाच्या Vaibhav Sooryavanshi ची टीम इंडियात एन्ट्री; इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, सचिनचा 37 वर्षांचा विक्रम मोडणार?

Vaibhav Sooryavanshi Selected For England Ireland Tour: बीसीसीआयने आगामी इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. यावेळी १५ वर्षीय स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 06, 2026 | 03:01 PM
15 वर्षाच्या Vaibhav Sooryavanshi ची टीम इंडियात एन्ट्री; इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, सचिनचा 37 वर्षांचा विक्रम मोडणार?
Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री
  • इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर
  • सचिनचा 37 वर्षांचा विक्रम मोडणार?
भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचे संकेत मिळत आहेत. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीच्या बैठकीत भारतीय नियामक मंडळाने (BCCI) आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकांसाठी तसेच सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या निवडीत सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव म्हणजे १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. आयपीएल २०२६ मधील धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर वैभवला भारतीय वरिष्ठ संघात संधी मिळाली आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यरची भारतीय टी-२० संघाच्या नव्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Virat Kohli: टीम इंडियाला मोठा झटका; अफगाणिस्ताननंतर इंग्लंड मालिकेलाही किंग कोहली मुकणार? रिपोर्टमुळे खळबळ

सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. वैभव सूर्यवंशीला आगामी मालिकांमध्ये पदार्पणाची संधी मिळाल्यास तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल. सध्या हा विक्रम ‘गॉड ऑफ क्रिकेट’ सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने पाकिस्तानविरुद्ध वयाच्या १६ वर्षे आणि २०५ दिवसांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. मात्र वैभव सध्या केवळ १५ वर्षे आणि ७१ दिवसांचा असल्याने तो हा ऐतिहासिक विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे.

भारतीय संघात आधीच अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनसारखे आक्रमक सलामीवीर असल्यामुळे वैभवला अंतिम अकरामध्ये संधी मिळेल का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे संघ व्यवस्थापन त्याच्यावर मोठा विश्वास दाखवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

“त्याने आम्हाला निवडीस भाग पाडले”- अजित आगरकर

मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी वैभवच्या निवडीमागील कारण स्पष्ट करताना सांगितले की,’ वैभव सूर्यवंशीने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आम्हाला त्याची निवड करण्यास भाग पाडले. सलग दोन आयपीएल हंगामांत त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. पुढे मोठी आव्हान कठीण असतील, पण त्याने उत्कृष्ट कामगिरी करत स्वतःला सिद्ध केले आहे.’

ते पुढे म्हणाले की, ‘तो अजून खूप लहान आहे आणि त्याचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे. देशांतर्गत हंगाम सुरू झाल्यावर आम्ही त्याचा खेळ पाहू . मात्र सध्या टी-२० संघासाठी काय योगदान देऊ शकतो, यावर आमचे लक्ष आहे.’

बीसीसीआयकडून विशेष लक्ष

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी वैभवच्या भविष्यासंदर्भात सावध भूमिका घेतली असल्याचे म्हटले आहे. ‘ते म्हणाले,आम्ही वैभवच्या भविष्याबद्दल खूप सावध आहोत आणि त्याचा प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.’

आयपीएल २०२६ मध्ये दमदार प्रदर्शन

वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. त्याने १४ सामन्यांत तब्बल ७७६ धावा करत ऑरेंज कॅप जिंकली. यामध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा सामवेश आहे. विशेष म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट तब्बल २३७.३१ इतका होता. जसप्रीत बुमराह, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध त्याने निर्भीड फलंदाजी करत सर्वांना प्रभावित केले.

Presenting #TeamIndia‘s T20I squads for the tours of England & Ireland 2026 🇮🇳#ENGvIND | #IREvIND pic.twitter.com/f84kSSAIDf — BCCI (@BCCI) June 6, 2026

आगामी मालिकांचे वेळापत्रक

भारताचा संघ २६ आणि २८ जून रोजी आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर, टीम इंडिया १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सामने १, ४, ७, ९ आणि ११ जुलै रोजी खेळले जातील. यानंतर १४ जुलैपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार असून अखेरचा सामना १९ जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. तसेच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांमध्ये भारत विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

IND Vs AFG: एक मॅच खेळायची अन् ६ महिने बसायचं?; ICC च्या अजब वेळापत्रकावर अफगाणिस्तानचा प्रशिक्षक भडकला…

Web Title: Vaibhav sooryavanshi selected in team india squad against ireland and england tour set to break sachin tendulkar record team india selection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Sachin Tendulkar
  • Shreyas Iyer
  • Team India Squad
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

‘सरपंच’ इज बॅक! Shreyas Iyer सांभाळणार T20 चा कारभार ; इंग्लंड-आयर्लंडचे धाबे दणाणले
1

‘सरपंच’ इज बॅक! Shreyas Iyer सांभाळणार T20 चा कारभार ; इंग्लंड-आयर्लंडचे धाबे दणाणले

Vaibhav Sooryavanshi: आयपीएलच्या धमाक्यानंतर वैभव नव्या अवतारात; श्रीलंकेत पोहोचताच स्टायलिश फोटो व्हायरल
2

Vaibhav Sooryavanshi: आयपीएलच्या धमाक्यानंतर वैभव नव्या अवतारात; श्रीलंकेत पोहोचताच स्टायलिश फोटो व्हायरल

अरे हा तर Shreyas Iyer? पाकिस्तान विरुद्ध सामन्यातील लुकचा ‘तो’ व्हिडिओ प्रचंड Viral; पहा सत्य
3

अरे हा तर Shreyas Iyer? पाकिस्तान विरुद्ध सामन्यातील लुकचा ‘तो’ व्हिडिओ प्रचंड Viral; पहा सत्य

Cricket News: सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडणार अवघ्या 15 व्या वर्षी Vaibhav Sooryavanshi, सर्वात लहान वयात पदार्पण करणारा खेळाडू
4

Cricket News: सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडणार अवघ्या 15 व्या वर्षी Vaibhav Sooryavanshi, सर्वात लहान वयात पदार्पण करणारा खेळाडू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.