फोटो सौजन्य - X
केकेआर विरुद्ध एसआरएच : 25 मे रोजी केकेआर विरुद्ध एसआरएच यांच्यामध्ये दोन्ही संघात आयपीएल 2025 चा शेवटचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकत्ताच्या निराशे जनक कामगिरीमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने कालच्या सामन्यात धावांचा डोंगर उभा केला होता त्यामुळे कोलकत्याच्या संघाला हैदराबाद विरुद्ध 110 ने पराभवाचे सामना करावा लागला. गेल्या हंगामातील आयपीएल विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सची या हंगामात कामगिरी खूपच खराब राहिली. तिला १४ पैकी फक्त ५ सामने जिंकता आले.
शेवटच्या लीग सामन्यात, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांना ११० धावांनी लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. संघातील अनेक खेळाडूंची कामगिरी त्यांच्या नावाप्रमाणे नव्हती यामध्ये सर्वात वरचे नाव वेंकटेश अय्यरचे आहे , ज्याला २३.७५ कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले. त्याला खूप जास्त किमतीला विकले गेले म्हणून तो दबावाखाली होता का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत पण केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने त्याचा बचाव करताना म्हटले आहे की, मैदानावरील वृत्तीशी किंमतीचा काय संबंध आहे.
CSK vs GT : शेवटच्या सामन्यात कॅप्टन कुल मैदानावर या दोन खेळाडूवर भडकला! Video Viral
केकेआरचा उपकर्णधार व्यंकटेश अय्यरने आयपीएल २०२५ मध्ये खराब कामगिरी केली तर दुखापतीमुळे शेवटचे काही सामनेही तो खेळू शकला नाही. अय्यरवर किमतीच्या दबावाची चर्चा पूर्णपणे फेटाळून लावताना रहाणे म्हणाला, ‘जर एखाद्या खेळाडूला २० कोटी किंवा १ किंवा २ किंवा ३ किंवा ४ कोटी मिळाले तरी मैदानावरील त्याचा दृष्टिकोन बदलत नाही.’ तेच महत्त्वाचे आहे, एक खेळाडू म्हणून तुम्ही फक्त नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता आणि मला वाटतं व्यंकटेश अय्यर फक्त नियंत्रित करण्यायोग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करत होता.
रहाणे म्हणाला, ‘वेंकटेशने योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केले होते. तो कठोर सराव करत होता, खेळादरम्यान वचनबद्ध होता आणि योगदान देण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा दृष्टिकोन उत्तम होता. कोणत्याही खेळाडूसोबत वाईट हंगाम येऊ शकतो. त्याचा पैशाशी किंवा किंमतीच्या दबावाशी काहीही संबंध नाही. ते फक्त फॉर्म आणि संघाशी संबंधित आहे. आमच्यासाठी, दुर्दैवाने ३ ते ४ खेळाडू एकाच वेळी खराब फॉर्ममधून जात होते, त्यामुळेच फरक पडला.