ऋषभ पंत(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : २० जूनपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले खेळवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता या सामन्याला सुरवात होणार आहे. अशा परिस्थितीत भारताच्या युवा संघावर परदेशी भूमीवर मालिका जिंकण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले. तर, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला संघाचा उपकर्णधाराची जबाबदारी सोपवली आहे.
हेडिंग्ले कसोटीपूर्वी, उपकर्णधार ऋषभ पंतने टीम इंडियाच्या वतीने पत्रकार परिषद घेतली होती. या दरम्यान, त्यांनी नुकत्याच अहमदाबाद विमान अपघाताबद्दल चर्चा केली. पंतने सांगितले की, ” विमान अपघात लक्षात ठेवला जाईल आणि देशाला आनंद देण्यासाठी इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केरणार आहे.”
हेही वाचा : IND vs ENG 1st Test Weather Report : हेडिंग्ले कसोटी पावसामुळे वाया जाईल का? पाचही दिवस पावसाची शक्यता
12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातात २४१ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. याबबद्दल बोलताना ऋषभ पंतने, “या अपघातात घडलेल्या घटनेमुळे लोक खूप भावनांमधून जात असणार, आम्ही देशासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न करणार आहोत, त्यांना कसे आनंदी करू शकतो आणि ही नेहमीच एक अतिरिक्त जबाबदारी असते.” यानंतर, पंत पुढे म्हणाला की, “तुम्हाला भारताला नेहमीच आनंदी ठेवायचे असताना एक क्रिकेटपटू म्हणून ते नेहमीच शक्य होते असे नाही,परंतु मी माझ्याकडून वचन देऊ शकतो की आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू आणि आम्ही आमचे २०० टक्के देणार आहोत जेणेकरून आम्ही देशवासीयांना आनंदी करू शकू.” असे पंत म्हणाला.
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर. पहिल्या कसोटीत इंग्लंडचे हे प्लेइंग इलेव्हन, दोन मजबूत खेळाडूंनी संघात पुनरागमन केले.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कृष्णा सिंह, अर्शदीप सिंह, अर्शदीप सिंह, कृष्णा, कृष्णा, कृष्णा, सी. कुलदीप यादव आणि हर्षित राणा.