किंग्सटाउन : प्रतिकूलतेच्या विरुद्ध यशाच्या प्रवासात आपल्या क्रिकेट इतिहासाचे सोनेरी पान लिहून, अफगाणिस्तानने T20 विश्वचषक 2024 सुपर आठ टप्प्यांतील सामन्यात डकवर्थ लुईस प्रणालीचा वापर करून बांगलादेशचा 8 गडी राखून पराभव करून प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला. हा अफगाणी खेळाडूंचा विजय म्हणजे जगभरातील क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेणारा होता. कारण अपुरी साधने, देशातील विचित्र वातावरण जे सर्व जगाला माहिती आहे, तिथे आपली आवड जिवंत ठेवत या खेळात नैपुण्य प्राप्त करणे फार मोठी कामगिरी आहे. 18व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नवीनुल हकने तस्किन अहमदची विकेट घेताच स्टेडिअममध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांचे डोळे भरून आले.
अफगाणिस्तानचा विजयानंतरचा जल्लोष
'𝘞𝘦 𝘩𝘢𝘷𝘦 𝘱𝘳𝘰𝘷𝘦𝘥 𝘰𝘯𝘦 𝘱𝘦𝘳𝘴𝘰𝘯 𝘷𝘦𝘳𝘺 𝘳𝘪𝘨𝘩𝘵' 👏
Rashid Khan reflects on Afghanistan's iconic entry into the semi-finals 👊#T20WorldCup #AFGvBANhttps://t.co/RJonpSrjtF
— ICC (@ICC) June 25, 2024
क्रिकेट खेळण्यासाठी अपुऱ्या साधने अन् तरीही मोठी कामगिरी
राजकीय अस्थिरता आणि युद्धाच्या भीषणतेचा सामना करणाऱ्या आणि सरावासाठी स्वत:चे मैदानही नसलेल्या देशाच्या संघाने ही कामगिरी केली. या रोमांचक सामन्यात प्रत्येक क्षणी फासे बदलत राहिले, पण शेवटी विजय राशिद खानच्या योद्ध्यांच्या नावे झाला ज्यांनी या विजयासह ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गजालाही स्पर्धेतून बाहेर केले. आता उपांत्य फेरीत 27 जून रोजी अफगाणिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार असून भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
बांगलादेशच्या गोलंदाजांनी धावगती रोखली
11व्या षटकात हुसेनच्या गोलंदाजीवर झाद्रानने (29 चेंडूत 18 धावा) विकेट गमावल्याने बांगलादेशला यश मिळाले. विकेटने मिळालेल्या मदतीचा पुरेपूर फायदा घेत बांगलादेशच्या गोलंदाजांनी धावगती वाढू दिली नाही. तस्किन अहमदने गुरबाजला मेडन ओव्हर टाकले, त्यानंतर शकीब अल हसनने पुढच्या षटकात फक्त तीन धावा दिल्या. गुरबाजने 14व्या षटकात दोन चौकारांसह 13 धावा केल्या. मुस्तफिझूर रहमान आणि हुसैन यांनी दहा चेंडूंत तीन बळी घेत अफगाणिस्तानची मोठी धावसंख्या उभारण्याचे मनसुबे उधळले. कर्णधार राशिदने अखेरच्या षटकात दोन षटकार मारत संघाला 100 धावांच्या पुढे नेले. कॅरिबियन ते काबूलपर्यंतच्या क्रिकेटप्रेमींना रोमांचित करणाऱ्या या कामगिरीचा अंदाज क्रिकेट पंडितांनाही करता आला नाही.
स्वप्न सत्यात अन् विजयाचा आनंद काबुलपर्यंत
THIS is what it means 🥹#T20WorldCup #AFGvBAN pic.twitter.com/wOAiJoWjjK
— ICC (@ICC) June 25, 2024
पाच गड्यांच्या मोबदल्यात 115 धावांवर रोखले
तत्पूर्वी, बांगलादेशच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करीत अफगाणिस्तानला पाच गड्यांच्या मोबदल्यात 115 धावांवर रोखले. लेगस्पिनर रिशाद हुसेनने 26 धावांत तीन बळी घेतले. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजही मोकळेपणाने खेळू शकला नाही आणि त्याने 55 चेंडू खेळून 43 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने बांगलादेशचा डाव 17.5 षटकांत 105 धावांत गुंडाळला. राशिद खानने 23 धावांत चार तर वेगवान गोलंदाज नवीनुल हकने 26 धावांत चार बळी घेतले.
सलामीच्या जोडीच्या जोरावर विजय
बांगलादेशसाठी लिटन दासने (नाबाद 54) एकट्याने गड राखला. पावसामुळे अनेकवेळा खेळ थांबला. अफगाणिस्तानने आतापर्यंत फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सलामीच्या जोडीच्या जोरावर विजय मिळवला आहे आणि आजही तीच गोष्ट कायम राहिली. गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी 59 धावांची भागीदारी केली तर फजलहक फारुकी आणि नवीनुलने नव्या चेंडूवर विकेट घेतल्या.