विनोद कांबळी(फोटो-सोशल मीडिया)
वाराणसी : भारतीय संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असतो. गेले काही महीने झाले विनोद कांबळीची तब्बेत ठीक नव्हती. त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. आता मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. विनोद कांबळीने पुन्हा आपला प्रवास सुरू केला आहे. अशातच आता विनोद कांबळी वाराणसीला पोहोचला आहे. वाराणसीमध्ये त्याने काशी विश्वनाथ मंदिरात प्रार्थना केली आहे. पूजेनंतर विनोद कांबळी यांनी हर हर महादेवचा जयघोष देखील केला.
हेही वाचा : Chahal-Dhanashree Divorce : धनश्रीपासून घटस्फोटाने खचला चहल, मास्कआड लपवल्या अश्रूधारा; पहा Video…
विनोद कांबळीने कुटुंबाचा आनंद आणि देशाच्या भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्याअ आहेत. विनोद कांबळीला वाराणसीत पाहून चाहत्यांना आनंद झाला. क्रिकेटप्रेमींमध्ये देखील विनोद कांबळीची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. माजी क्रिकेटपटू बाबा दरबारात दर्शनासाठी आल्याची बातमी कळताच त्याच्या चाहत्यांची एकच गर्दी ओसंडून आली. लोक त्याच्यासोबत सेल्फी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले.
विनोद कांबळीने मंदिर परिसराला भेट दिल्यानंतर तो म्हणाला की, काशीची ऊर्जा आणि बाबा विश्वनाथांचा आशीर्वाद अविस्मरणीय असा आहे. इथे आल्यावर मनाला विलक्षण शांती मिळत असते. त्याशिवाय वाराणसीच्या संस्कृतीचे आणि अध्यात्माचे देखील कांबळीने कौतुक केले.
विनोद कांबळीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द केवळ 14 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने इतकीच राहिली आहे. या कालावधीत, त्याने कसोटीत सर्वाधिक 227 धावांसंख्येसह 1084 धावा केल्या, तर एकदिवसीय सामन्यात त्याने 2427 धावा केल्या आहेत. विनोदने कसोटीत 4 शतके केली आहेत तर वनडेत त्याने 2 शतकं ठोकली आहेत.
विनोद कांबळी यांनी त्यांच्या आयुष्यात दोनदा लग्न केले. 1998 मध्ये त्याने पहिले लग्न नोएल लुईसशी केले होते. नोएला पुण्यातील हॉटेल ब्लू डायमंडमध्ये रिसेप्शनिस्ट होती. हे प्रेमविवाह फार काळ टिकू शकले नाहीत आणि त्याची परिणती घटस्फोटात झाली. यानंतर कांबळीने मॉडेल अँड्रिया हेविटशी लग्न केले. कांबळीला एक मुलगा येशू क्रिस्टियानो कांबळी आणि एक मुलगी असा परिवार आहे.
आयपीएल 2025 चा पहिला सामना 22 मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.