Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL चा ‘बॉस’ ठरला Virat Kohli; कमाईचा आकडा वाचून फिरतील डोळे, रोहित-धोनीही पडले मागे

Virat Kohli Become Highest Paid Player in IPL: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहली हा आयपीएलमध्ये सर्वात जास्त कमाई कऱणारा खेळाडू ठरला आहे. त्याने रोहित शर्मा आणि एमएस धोनीलाही मागे टाकले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 20, 2026 | 04:50 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • विराट कोहली IPL चा श्रीमंत खेळाडू
  • रोहित आणि धोनीची बंपर कमाई
  • महिला क्रिकेटमध्ये मंधाना अव्वल
भारतीय संघाचा आणि रॉयस चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा आयपीएलमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारा खेळाडू ठरला आहे. फॅनॅटिक स्पोर्ट्स आणि हुरुनच्या एका अहवालानुसार, विराट कोहली आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. १९ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचा भाग असलेल्या विराट कोहलीने (Virat Kohli) आतापर्यंत अंदाजे २३० कोटी रुपये कमावले असून तो या यादीत अव्वल स्थानी आहे. तसेच, सर्व १० आयपीएल फ्रँचायझींचे एकूण वॅल्यूएशन १.६३ लाख कोटी रुपये आहे.

Pak vs Ban Test: पाकिस्तानचा पराभव, भारताचं टेन्शन वाढलं! बांग्लादेशने घरच्या मैदानावर केला पाकिस्तानचा सूपडा साफ

विराट कोहली IPL चा श्रीमंत  खेळाडू

सर्वात श्रीमंत आयपीएल खेळाडूंच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. तो २००८ पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाकडून खेळत असून त्याने आतापर्यंत २३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीतही तो लीगचा सर्वात मोठा स्टार आहे.

रोहित आणि धोनीची बंपर कमाई

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा २२७.२ कोटी रुपयांच्या कमाईसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) महेंद्रसिंग धोनी २०० कोटी रुपयांच्या कमाईसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. धोनी भारतीय क्रिकेट आणि आयपीएलचा एक प्रमुख कमर्शियल आयकॉन आहे.

या फ्रेंचायझीची व्हॅल्यू सर्वात जास्त

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि जुही चावला यांच्या कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाचे वॅल्यूएशन १९,२०० कोटी असून, हे देशातील सर्वात व्हॅल्यूबल आयपीएल फ्रँचायझी ठरली आहे. यानंतर, मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) हे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाकांवर आहेत. दोन्ही संघांचे वॅल्यूएशन अंदाजे १८,४०० कोटी रुपये आहे. सर्व १० आयपीएल फ्रँचायझींचे एकूण वॅल्यूएशन आता १.६३ लाख कोटीं रुपयांवर पोहोचले आहे.

महिला क्रिकेटमध्ये मंधाना अव्वल

आयपीएलमध्ये कोट्यवधी रुपये मिळत असले तरी इतर खेळाडू अजूनही या यादीत मागे आहेत. महिला क्रिकेटमध्ये, स्मृती मंधाना ही सर्वाधिक मानधन घेणारी खेळाडू आहे. १३.७ कोटी रुपये कमाईसह ती यादीत अव्वल स्थानी आहे. देशातील अव्वल १० महिला क्रिकेटपटूंची एकत्रित कमाई ९० कोटी रुपये आहे, जी विराट कोहलीच्या आयपीएलमधील २३० कोटी कमाईच्या निम्म्याहून कमी आहे. इतर खेळांमध्ये हे अंतर आणखी मोठे आहे.

हरमनप्रीत हॉकीमधील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू

देशाचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीच्या बाबतीत हा फरक अधिकच स्पष्ट दिसतो. अहवालानुसार, डिफेंडर हरमनप्रीत सिंग हा ७८ लाख रुपये पगारासह हॉकी इंडिया लीगमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे. त्याच्यापाठोपाठ ७२ लाख रुपये कमाईसह फॉरवर्ड अभिषेक नैन आणि ७० लाख रुपये कमाईसह मिडफिल्डर हार्दिक सिंग दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

KKR vs MI: प्लेऑफच्या रेसमध्ये KKR बाजी मारणार की MI देणार धक्का; कशी असेल ईडन गार्डन्सची पिच अन् संभाव्य प्लेइंग ११?

Web Title: Virat kohli highest paid ipl player rohit sharma ms dhoni ipl franchise valuation marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • IPL 2026
  • M.S. Dhoni
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

वादळ येणार, ब्रिटिशांचा सुपडा साफ होणार! Rohit Sharma चा नेट्समध्ये कसून सराव, Video Viral
1

वादळ येणार, ब्रिटिशांचा सुपडा साफ होणार! Rohit Sharma चा नेट्समध्ये कसून सराव, Video Viral

MS Dhoni Birthday: विजेचा वेग, पोलादी धैर्य, प्रत्येक आव्हान झाले नतमस्तक; तिकिट कलेक्टर धोनी ते सर्वश्रेष्ठ कर्णधार
2

MS Dhoni Birthday: विजेचा वेग, पोलादी धैर्य, प्रत्येक आव्हान झाले नतमस्तक; तिकिट कलेक्टर धोनी ते सर्वश्रेष्ठ कर्णधार

अफलातून! बॅट आहे की जादूची छडी; Karanbir Singh ची वादळी खेळी अन् Rohit Sharma चा ‘तो’ रेकॉर्ड उद्ध्वस्त
3

अफलातून! बॅट आहे की जादूची छडी; Karanbir Singh ची वादळी खेळी अन् Rohit Sharma चा ‘तो’ रेकॉर्ड उद्ध्वस्त

IND vs ENG: श्रेयस अय्यरचा धमाका! इंग्लंडमध्ये टी-20 अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार; विराट कोहलीलाही टाकले मागे
4

IND vs ENG: श्रेयस अय्यरचा धमाका! इंग्लंडमध्ये टी-20 अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार; विराट कोहलीलाही टाकले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.