Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli: टीम इंडियाला मोठा झटका; अफगाणिस्ताननंतर इंग्लंड मालिकेलाही किंग कोहली मुकणार? रिपोर्टमुळे खळबळ

Virat Kohli To Miss Multiple Series Due To Injury: अफगाणिस्तानविरुद्ध वनडे सीरीजमधून बाहेर पडल्यानंतर विराट कोहली इंग्लंड विरुद्धच्या मालिकेला देखील मुकण्याची शक्यता आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 06, 2026 | 01:46 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियाची चिंता
  • इंग्लंड मालिकेलाही विराट कोहली मुकणार?
  • आयपीएल फायनलमध्ये झाली दुखापत
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली Virat Kohli अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडल्याने चाहते निराश झाले होते. परंतु आता आणखी एका बातमीने टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. वृत्तानुसार, कोहली आगामी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. आयपीएल 2026 फायनलदरम्यान झालेल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. आता ही दुखापत अधिक गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. वृत्तानुसार, ही दुखापत त्याला किमान सहा आठवडे मैदानाबाहेर ठेवू शकते.

IND Vs AFG: एक मॅच खेळायची अन् ६ महिने बसायचं?; ICC च्या अजब वेळापत्रकावर अफगाणिस्तानचा प्रशिक्षक भडकला…

सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, ‘कोहलीने आपल्या दुखापतीबाबत मुंबईतील ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. दिनशॉ पारदीवाला यांच्याशी सल्लामसलत केली आहे. शस्त्रक्रियेची गरज नसली तरी पूर्णपणे फिट होण्यासाठी सुमारे सहा आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. या काळात बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रिहाबसाठी पोहचले, शिवाय बरे होण्यासाठी अंदाजे सहा आठवडे लागतील.’ त्यामुळे १४ जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याचा सहभाग कठीण मानला जात आहे. इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १४ जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये सुरू होत आहे.

आयपीएल फायनलमध्ये झाली दुखापत

अहमदाबाद येथे झालेल्या आयपीएल २०२६ च्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने नाबाद ७५ धावांची शानदार खेळी केली होती. मात्र खेळादरम्यान त्याला पायात त्रास जाणवत असल्याचे दिसून आले होते. सुरुवातीला साधा ताण असल्याचे वाटत असले तरी एमआरआय स्कॅननंतर हॅमस्ट्रिंग टेंडन फाटल्याचे स्पष्ट झाले.

कोहलीच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी?

विराट कोहली संघातील सर्वात अनुभवी फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या अनुपस्थितीत मधल्या फळीची जबाबदारी युवा खेळाडूंवर येणार आहे. कोहलीच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. आयपीएलदरम्यान रियान पराग जखमी झाल्यानंतर गायकवाडचा इंडिया ‘अ’ संघात समावेश करण्यात आला होता आणि निवड समितीने त्याला संघात स्थान दिले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेत कोणाला संघात स्थान मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.

रोहित शर्माची फिटनेस चाचणी होणार

अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी रोहित शर्माचीही फिटनेस टेस्ट होणार आहे. तो टेस्टसाठी ८ जून रोजी बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये हजर राहण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी रोहितचा संघात समावेश करण्यात आला असला तरी त्याचा सहभाग पूर्णपणे फिटनेस टेस्टच्या निकालावर अवलंबून असेल. आयपीएल २०२६ दरम्यान रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला मुंबई इंडियन्सकडून अनेक सामने खेळता आले नव्हते.

सेकंदांचा उशीर अन् थेट बाद! महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘टाईम आऊट’चा थरार, ‘ही’ खेळाडू ठरली बळी

Web Title: Virat kohli likely to miss england odi series after afghanistan series hamstring injury update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • bcci
  • IND vs AFG
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

मुद्दाम नो-बॉल टाकताय? BCCI करणार थेट ‘ही’ मोठी कारवाई, खेळाडूंना राहावे लागणार सतर्क
1

मुद्दाम नो-बॉल टाकताय? BCCI करणार थेट ‘ही’ मोठी कारवाई, खेळाडूंना राहावे लागणार सतर्क

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य
2

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !
3

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…
4

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.