Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB: ‘Ee Sala Nu Cup Namde’ विजयानंतर RCB ने अचानक घेतला मोठा निर्णय; लाखो चाहते नाराज

No Victory Parade In Bengaluru after RCB Win: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हंगामात दमदार कामगिरी आयपीएल २०२६चे विजेतेपद पटकावले. यानंतर आरसीबी संघ विक्ट्री परेड करणार का याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 01, 2026 | 01:58 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Close
Follow Us:
  • आरसीबीने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफीवर कोरले नाव
  • विजयानंतर RCB ने अचानक घेतला मोठा निर्णय
  • लाखो चाहते नाराज
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रविवारी (३१ मे) गुजरात टायटन्सचा ५ विकेट्सने धुव्वा उडवत आयपीएल २०२६ चे विजेतेपद पटकावले. आरसीबीने संघाने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकत इतिहास रचला आहे. यानंतर, संपूर्ण बंगळुरूमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र या विजयानंतर संघाच्या चाहत्यांसाठी मोठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. RCB व्यवस्थापनाने आणि प्रशासनाने चाहत्यांना संयम आणि जबाबदारीने सेलिब्रेशन करण्याचे आवाहन केले आहे. संघाने यंदा बंगळुरूमध्ये कोणतीही सार्वजनिक विजय मिरवणूक किंवा मोठा सेलिब्रेशन कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाखो चाहत्यांना टीमसोबत सेलिब्रेशन करण्याची संधी मिळणार नाही.

RCB Record: रजत पाटीदार IPL च्या इतिहासत ‘ही’ कमाल करणारा पहिला कॅप्टन, रोहित – धोनीही करू शकले नाहीत रेकॉर्ड

सोशल मीडियावरून खास संदेश

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरसीबीच्या विजयानिमित्त यावेळी विक्ट्री परेड (Victory Parade) निघणार नाही. चाहत्यांना संघाचा विजय इनडोअर (घराच्या आत) साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विजयानंतर RCB ने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांना ‘घरी राहून सुरक्षितपणे विजय साजरा करा,’ असे आवाहन संघाने केले. गेल्या वर्षी झालेल्या दुर्घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा कोणतीही जोखीम घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले. RCB व्यवस्थापनाने यंदा शांत आणि मर्यादित पद्धतीने विजय साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरसीबीच्या एका सूत्राने वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘बंगळुरूमध्ये कोणत्याही प्रकारचा जल्लोष होण्याची शक्यता खूपच कमी आहे. काही विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यात आली आहेत आणि आम्हाला त्यांचे पालन करावे लागेल.’ दरम्यान, बंगळुरु शहर पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह म्हणाले, ‘आम्ही कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक उत्सवाला परवानगी देणार नाही. जर कोणाला उत्सव साजरा करायचा असेल, तर ते घराच्या आत करू शकतात.’

Good morning, 12th Man Army. ❤️ Safe to say this is the best way to start a new month? 😉🏆#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2026 pic.twitter.com/2fRgWxGgH6 — Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 1, 2026
What a night. What a feeling. 🥹 To every member of the RCB nation, congratulations. This is YOUR win. 🏆❤️ As the celebrations begin, let’s be responsible. 🙌 Best way to celebrate is with your loved ones. Relive the memories, and enjoy this special moment from the comfort of… pic.twitter.com/hdGO3n115a — Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 31, 2026

पोलिसांचा कडक इशारा

बंगळुरू पोलिसांनी अंतिम सामन्यापूर्वीच सार्वजनिक सेलिब्रेशन, बाइक रॅली आणि मोठ्या गर्दीवर निर्बंध घातले होते. चाहत्यांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये, असे आवाहनही करण्यात आले होते. पोलिसांनी अंतिम सामन्यापूर्वीच शहरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली होती. विशेषतः एम. चिन्नास्वामी स्टेडियम परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 शिवकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यामुळे घेतला निर्णय?

चिन्नास्वामी स्टेडियमजवळ असलेल्या लोक भवन येथे कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. राज्यभरातून, अनेक प्रमुख व्यक्तींसह मोठी गर्दी अपेक्षित आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाईल, ज्यामुळे राज्य पोलीस विभागाला अशा आणखी एका हाय-व्होल्टेज कार्यक्रमासाठी सुरक्षा पुरवणे कठीण होईल. ही परिस्थिती लक्षात घेऊन, आरसीबी व्यवस्थापनाने बंगळुरुमध्ये सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षीच्या दुर्घटनेनंतर RCB चे सावध पाऊल

दोन वेळचे आयपीएल विजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) संघाने गेल्या वर्षीच्या विजयातून धडा घेतला असून, या वेळी विजय मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करून आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले. मात्र, या वेळी बंगळुरुमध्ये विजय मिरवणूक न काढण्याचा निर्णय फ्रँचायझीने घेतला आहे. २०२५ मध्ये RCB ने पहिले आयपीएल विजेतेपद जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सेलिब्रेशनदरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत अनेक ११ चाहत्यांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर प्रशासन आणि पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. याच पार्श्वभूमीवर यंदा कोणताही धोका पत्करायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

विराट कोहली पुन्हा ठरला हिरो

अंतिम सामन्यात विराट कोहलीने Virat Kohli याने दमदार अर्धशतक झळकावत RCB च्या विजयात मोठी भूमिका बजावली. त्याच्या शानदार खेळीमुळे संघाने सलग दुसरे विजेतेपद पटकावले.

IPL Final: एकीकडे हार तर दुसरीकडे आग! GT च्या बसचा आगीचा व्हिडिओ व्हायरल, रस्त्यावर 1 तास बसले खेळाडू; चाहत्यांचा घेराव

Web Title: Virat kohli rcb champions victory parade cancelled bengaluru ipl 2026 cricket marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • dk shivkumar
  • Royal Challengers Bengaluru
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

RCB च्या विजयानंतर अनुष्का – विराटचं जोरदार सेलिब्रेशन; मिसेस कोहलींची पहिली पोस्ट चर्चेत; टी-शर्टवरील 2 ओळींनी वेधलं लक्ष
1

RCB च्या विजयानंतर अनुष्का – विराटचं जोरदार सेलिब्रेशन; मिसेस कोहलींची पहिली पोस्ट चर्चेत; टी-शर्टवरील 2 ओळींनी वेधलं लक्ष

RCB Vs GT Final Live: ई साला ‘पुन्हा’ कप नाम्दे! Virat Kohli समोर गुजरातचा पराभव; आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन
2

RCB Vs GT Final Live: ई साला ‘पुन्हा’ कप नाम्दे! Virat Kohli समोर गुजरातचा पराभव; आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन

Virat Kohli एका Instagram पोस्टमधून कमावतो तब्बल ‘इतके’ कोटी रुपये! आकडा ऐकून थक्क व्हाल
3

Virat Kohli एका Instagram पोस्टमधून कमावतो तब्बल ‘इतके’ कोटी रुपये! आकडा ऐकून थक्क व्हाल

IPL Final 2026: IPL फायनलचा थरार!  विजेत्यावर होणार ‘इतक्या’ कोटींचा वर्षाव; उपविजेताही होणार मालामाल; जाणून घ्या प्राइज मनी
4

IPL Final 2026: IPL फायनलचा थरार! विजेत्यावर होणार ‘इतक्या’ कोटींचा वर्षाव; उपविजेताही होणार मालामाल; जाणून घ्या प्राइज मनी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.