Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: मैदानावर विराट-हेड आमनेसामने! बाचाबाचीने तापलं वातावरण; ‘हँडशेक’ नाकारल्याचा Video Viral

Virat Kohli-Travis Head No Handshake: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यात विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर कोहलीने हेडसोबत हँडशेक करण्यास नकार दिला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 23, 2026 | 01:34 PM
IPL 2026: मैदानावर विराट-हेड आमनेसामने! बाचाबाचीने तापलं वातावरण; ‘हँडशेक’ नाकारल्याचा Video Viral
Follow Us
Close
Follow Us:
  • मैदानावर तापलं वातावरण
  • कोहली आणि ट्रॅव्हिस हेडमध्ये बाचाबाची
  • ‘हँडशेक’लाही नकार
आयपीएल २०२६ चा ६७ वा लीग स्टेज सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पार पडला. हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. या हायस्कोअरिंग सामन्यात, सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला ५५ धावांनी पराभूत केले. हा सामना केवळ फलंदाजी किंवा गोलंदाजीपर्यंत मर्यादित नव्हता तर या महत्त्वपूर्ण सामन्यादरम्यान, स्टार फलंदाज विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली, ज्यामुळे मैदानावरचे वातावरण तापले. मात्र, सामना संपल्यानंतरही कोहलीचा राग कायम होता आणि त्याने हेडशी हँडशेक करण्यास नकार दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या वादानंतर विराट कोहली क्रीजवर जास्त वेळ टिकू शकला नाही आणि त्याने आपली विकेट गमावली.

IPL 2026: नशिबाचा खेळ की कष्टाचं फळ? 4 संघ अन् जागा 1; प्लेऑफसाठी ‘कांटे की टक्कर’

नेमकं काय घडलं?

आरसीबी २५६ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करत असताना विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात हा जोरदार वाद झाला. फिरकी गोलंदाज शिवांग कुमारने डावातील चौथे षटक टाकले. ट्रॅव्हिस हेडने टाकलेला चेंडू कोहलीच्या अगदी जवळून गेला, ज्यामुळे कोहली संतापला. यानंतर, कोहली आणि हेड एकमेकांशी वाद घालताना दिसले. षटक संपल्यानंतरही या दोन खेळाडूंमधील वाद सुरूच राहिला. यानंतर, व्यंकटेश अय्यरने मारलेल्या चौकार आणि षटकारांनंतर कोहली वारंवार हेडवर टोमणा मारताना दिसला. कोहलीने ट्रॅव्हिस हेडला नक्की काय म्हटले हे स्पष्ट नाही. हेडसुद्धा गप्प बसला नाहीत आणि त्यानेही विराटला हावभावांनी उत्तर दिले. पुढच्याच षटकात व्यंकटेश अय्यर बाद झाल्याने सामन्यातील रंगत आणखी वाढली. जल्लोषादरम्यान, हेड कोहलीजवळून गेला आणि त्याच्याशी बोलला, ज्यामुळे विराटने सडेतोड उत्तर दिले. याआधी, सामन्याच्या पहिल्या डावात हेड बाद झाल्यानंतर कोहलीने जोरदार जल्लोष केला होता

Virat Kohli didn’t shake hands with Travis Head after the match ended. pic.twitter.com/74UEXm1aUV — Cricketopia (@CricketopiaCom) May 22, 2026
#ViratKohli 🆚 #TravisHead 🥵🤯 Tensions rise in high voltage clash🔥#TATAIPL Race to Playoffs 2026 👉 #SRHvRCB | LIVE NOW ➡️https://t.co/52qPTW2gSO pic.twitter.com/JOiWaxNW6T — Star Sports (@StarSportsIndia) May 22, 2026

कोहलीचा हेडसोबत हँडशेक करण्यास नकार

मैदानावरचा वाद संपला होता, पण सामना संपल्यानंतरही कोहलीचा राग शांत झाला नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये कोहली सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या इतर खेळाडूंशी हस्तांदोलन करताना दिसत आहे, त्याने पॅट कमिन्सशी हस्तांदोलन केले, त्यानंतर ट्रॅव्हिस हेडनेही हस्तांदोलनासाठी हात पुढे केला पण त्याने हेडकडे बघितलेही नाही. मात्र, हेडने विराटशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला, पण कोहलीने त्या एसआरएचच्या सलामीवीराकडे दुर्लक्ष करून तो पुढे निघून गेला. सामन्यानंतर, दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांना हँडशेक करत असताना, कोहली आणि हेड यांच्यातील तणाव पुन्हा एकदा स्पष्ट दिसला.

सामना जिंकूनही हैदराबाद तिसऱ्या स्थानी

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० ओव्हरमध्ये ४ विकेट्स गमावून २५५ धावा केल्या. अभिषेक शर्माने २२ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ५ षटकारांसह ५६ धावा केल्या. दरम्यान, इशान किशनने केवळ ४६ चेंडूंमध्ये ७९ धावा करत एक धडाकेबाज खेळी केली. हेनरिक क्लासेनने अवघ्या २४ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या. २५६ धावांचे लक्ष्य गाठताना, आरसीबीला २० ओव्हरमध्ये ४ विकेट्स गमावून केवळ २०० धावा करता आल्या. रजत पाटीदारने कर्णधार म्हणून ५६ धावांची खेळी करत संघाचे नेतृत्व केले, तर व्यंकटेश अय्यरने १९ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांसह ४४ धावा केल्या. कृणाल पांड्या ४१ धावांवर नाबाद राहिला, पण संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

IPL 2026 Points Table : 15 वर्षांनंतर RCBचा दबदबा! गुणतालिकेत अव्वल स्थान; IPL इतिहासात किती वेळा ठरली No.1?

Web Title: Virat kohli travis head fight handshake controversy rcb vs srh ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Royal Challengers Bengaluru
  • Travis Head
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IPL 2026 Points Table : 15 वर्षांनंतर RCBचा दबदबा! गुणतालिकेत अव्वल स्थान; IPL इतिहासात किती वेळा ठरली No.1?
1

IPL 2026 Points Table : 15 वर्षांनंतर RCBचा दबदबा! गुणतालिकेत अव्वल स्थान; IPL इतिहासात किती वेळा ठरली No.1?

RCB Vs SRH Live: ‘पिक्चर अभी बाकी है’! पाटीदारने बिघडवला ‘एसआरएच’चा खेळ; हैदराबाद वेटिंगवर
2

RCB Vs SRH Live: ‘पिक्चर अभी बाकी है’! पाटीदारने बिघडवला ‘एसआरएच’चा खेळ; हैदराबाद वेटिंगवर

तूफान आलंया! SRH ‘या’ त्रिमूर्तींनी RCB ला पालापाचोळ्यासारखं उडवलं; बंगळुरूला दिले 256 रन्सचे टार्गेट
3

तूफान आलंया! SRH ‘या’ त्रिमूर्तींनी RCB ला पालापाचोळ्यासारखं उडवलं; बंगळुरूला दिले 256 रन्सचे टार्गेट

SRH Vs RCB Live: आज लढाई टॉप 2 ची! पॅट कमिन्सने जिंकला टॉस; घेतला ‘हा’ निर्णय
4

SRH Vs RCB Live: आज लढाई टॉप 2 ची! पॅट कमिन्सने जिंकला टॉस; घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.