Virat Kohli: 'I may not be seen playing again..'; Virat Kohli's statement that upset fans even before IPL
Virat Kohali : भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियातील काही सीनियर खेळाडूंच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागेल आहेत. कर्णधार रोहित शर्माने या क्षणी निवृत्ती घेण्यास नकार दिला कळवला आहे. मात्र, तारांकित फलंदाज विराट कोहलीने याबाबत स्पष्ट काहीही सांगितलेले नाही. चाहत्यांनाही या दोन दिग्गजांच्या भवितव्याची चिंता असून आता कोहलीने आपल्या एका विधानाने सर्वांची अस्वस्थता वाढवली आहे. विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल सांगितले की तो कदाचित पुन्हा ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना दिसणार नाही. या विधानाने चाहते नाराज झाले आहेत.
आयपीएलचा 18 व्या हंगामाची सुरवात 22 मार्चपासून होणार आहे. त्यापूर्वी विराट कोहली शनिवारी 15 मार्च रोजी त्याच्या फ्रेंचायझी बेंगळुरूमध्ये सामील झाला. यावेळी त्याने फ्रँचायझीच्या एका कार्यक्रमात अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यादरम्यान त्याच्या अलीकडच्या फॉर्मबाबत प्रश्न विचारण्यात आला. विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोनशेहून अधिक धावा केल्या आहेत. मात्र, त्याआधी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो धावा करण्यात अपयशी ठरला होता. त्याने केवळ एकच शतक झळकावले होते. यापूर्वी त्याचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातवर चांगलाच दबदबा राहील आहे. त्याने या दरम्यान अनेक विक्रम रचले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण दौऱ्यात विराट कोहली वारंवार ऑफ-स्टंपबाहेरील चेंडूंवर आऊट होताना दिसून आला. हे पाहून केवळ चाहतेच नाही तर तज्ञांनाही आश्चर्य आणि त्रास झाल्याचे त्यांच्या वेकट होण्यातून दिसून आले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा कोहलीला त्या दौऱ्यावर फलंदाजीतील संघर्षाबद्दल विचारण्यात आले तेव्हा भारताचा माजी कर्णधार म्हणाला की, ‘कदाचित मी पुन्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळू शकणार नाही, त्यामुळे यापूर्वी जे काही घडले, त्यात मी समाधानी आहे.’ टीम इंडियाचा आगामी ऑस्ट्रेलिया दौरा 2027 च्या शेवटी होणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर कोहलीच्या कसोटी कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. आयपीएलनंतर इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची संघात निवड होईल का? निवड झाल्यास या मालिकेनंतरच तो निवृत्त होणार का? असे अनेक प्रश्न मीडिया, तज्ज्ञ आणि चाहते सातत्याने विचारू लागले आहेत तसेच त्यावर आता चर्चाही होत आहेत.
आयपीएल 2025 चा पहिला सामना २२ मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025 पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.