तू है तो, दिल धडकता है..! पत्नीच्या रोमँटिक मेसेजवर 'यॉर्कर किंग' बुमराह 'क्लीन बोल्ड'(फोटो-सोशल मीडिया)
Jaspreet Bumrah : भारताने चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावे केलीय आहे. न्यूझीलंडला पराभूत करत भारताने हे विजेतेपद जिंकले आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेत जसप्रीत जसप्रीत बूमराहला मात्र खेळता आले नाही. पाठीच्या दुखण्यामुळे त्याला मैदानाबाहेर राहावे लागले होते. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. सिडनी कसोटीपासून तो संघाच्या बाहेरच आहे. दुखापतीमुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला मुकावे लागले होते.
तसेच तो आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांदेखील मुकावे लागणार असल्याची माहिती मिळत आहे. भारताचा वेगवान गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहचा चार वर्षांपूर्वी संजना गणेशनसोबत विवाह झाला होता. गोव्यामध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. 15 मार्च 2025 ला त्यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवशी संजना गणेशनने पती जसप्रीत बुमराहसाठी एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
संजना गणेशने पोस्ट करत लिहिलं आहे की, ‘तू ही तो है दिल धड़कता है, तू ना तो घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता, हॅप्पी-4…’ तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या पोस्टखाली मोठ्या संख्येने युजर्स देखील दोघांना शुभेच्छा देत आहेत. भारताचा स्टार गोलंदाज बुमराह हा सध्या बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसमधून फिटनेस क्लियरन्सची वाट पाहात आहे.
जानेवारीमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान त्याला पाठीला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो क्रिकेट खेळलेला नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही त्याला खेळता आले नाही. आता आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यातही खेळू शकणार नाही.मात्र आता त्याचे संपूर्ण लक्ष आयपीएल 2025 वर असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो सध्या बेंगळुरूमध्ये पुनर्वसन सुरू आहे. बुमराह या महिन्याच्या अखेरीस ठीक होणार आहे. त्याच्या संघात परतण्याने मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा मिळणार आहे.
बुमराहच्या पाठदुखीवर 2023 शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास वर्षभर तो मैदानाच्या बाहेर होता. त्यानंतर त्याने जबरदस्त कमबॅक केलं होतं. तसेच टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी करत भारताला टी20 वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
हेही वाचा : IPL 2025 :आयपीएलपूर्वीच ‘या’ 3 संघांसाठी आनंदांचा जॅकपॉट; 5 तगड्या खेळाडूंचे होणार पुनरागमन..
क्रिकबझच्या अहवालानुसार, बीसीसीआयचे स्पोर्ट सायंस चीफ नितीन पटेल बुमराहच्या रिकव्हरीवर लक्ष ठेवून आहे. बुमराहची गोलंदाजी शैली पाहता त्याला दुखापत होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे टीम इंडिया व्यवस्थापन त्याच्या वर्कलोडचं व्यवस्थापन करताना काळजी घेत आहे.