Champion Trophy 2025 : देशाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली, आता कुटुंबासह 'हा' खेळाडू मालदीवला घालवतोय वेळ(फोटो-सोशल मीडिया)
Champion Trophy 2025 : भारताने न्यूझीलंडचा पराभव करून चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. दुबईत 9 मार्चला खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 गड्यांनी पराभव केला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने पूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात रोहित शर्माने 73 धावांची तडाखेबाज खेळी करून भारताचा विजय सोपा केला होता. या विजयानंतर रोहित शर्मा आपल्या कुटुंबासोबत मालदीवला फिरायला गेला आहे. रोहित आणि कुटुंबाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
चॅम्पियन ट्रॉफीच्या विजयानंतर रोहित शर्मासह टीम इंडिया मायदेशी परतली. आता आपल्या व्यस्त वेळापत्रकातून मुक्त होऊन रोहित शर्मा मालदीवमध्ये पोहोचला आहे. रोहित त्याची पत्नी रितिका सजदेह, मुलगी समायरा आणि मुलगा अहान शर्मासोबत मालदिवला गेला आहे. अनेकांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
रोहित शर्माने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो वेगवेगळ्या लुकमध्ये दिसून येत आहे. ज्यामध्ये त्याची पत्नी आणि मुलेही त्याच्यासोबत आहेत. काही फोटोमध्ये रोहित शर्मा आपल्या मुलीसोबत समुद्र किनाऱ्यावर उभा आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तो आपल्या संपूर्ण कुटुंबासह समुद्राजवळील एका रेस्टॉरंटमध्ये दिसून येत आहे. रोहित शर्माचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना चाहत्यांनी वेगवेगळे कॅप्शन देखील दिले आहेत.
Captain Rohit Sharma Latest Story On Instagram,Rohit is enjoying in the Maldives with his family.#RohitSharma pic.twitter.com/PU3TySyCUg
— 𝐊𝐫𝐢𝐬𝐡𝐧𝐚 𝕏 (@Krrishnahu) March 14, 2025
आयपीएलचा 18 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. या हंगामातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. रोहित शर्मा सध्या मालदीवमध्ये कुटुंबासह वेळ घालवत आहे. तेथून त्याला लवकरच परतावे लागणार आहे. त्यानंतर तो मुंबई इंडियन्स संघात सहभागी होणार आहे. सध्या मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हे हार्दिक पांड्यांकडे असणार आहे.
हेही वाचा : IPL 2025 चा 18 वा सिझन पडणार फिका! हे स्टार खेळाडू स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळणार नाही
Captain Rohit Sharma enjoying his free time in Maldives with Ritika bhabhi and Sammy.🥹😍❤️ pic.twitter.com/rom1n3Qr0E
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) March 14, 2025
भारताने न्यूझीलंड संघाचा 4 विकेटने पराभव करून 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. या विजयाने भारताने तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून त्याने एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे.