मोहाली : आज मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि लखनऊचे नवाब यांच्यात लढत सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या खेळपट्टीवर चांगले गवत आहे. मागील सामन्यात पंजाब किंग्जने केकेआर विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना चांगला स्कोअर केला होता त्यामुळे ते चेस करताना केकेआर पराभूत झाली होती. या पिचवर साधारणतः प्रथम फलंदाजी करणाऱ्यांनी 173 एवढा स्कोअर करणे आवश्यक आहे. पहिल्याच चेंडूवर केएल राहुलचा कॅच तायडेने सोडून मोठे जीवदान दिले. पंजाबच्या कर्णधाराने रागाने पाहिले, पण काय करणार कॅच तर निसटून गेला होता. 2 ओव्हरमध्ये 19 धावा केल्या आहेत. मेअर्सने जबरदस्त फलंदाजी करीत 24 चेंडूत 54 धावा चोपल्या. त्याच्या तडफदार फलंदाजीच्या जोरावर पॉवर प्लेमध्ये 6 ओव्हरमध्ये 74 धावांवर लखनऊ पोहचली आहे. मार्क्स स्टोईनीसचा एक कॅच पकडताना सीमेवर पाय लागल्याने तो झेल रद्द ठरला, ही मोठी गंमत आज पाहायला मिळाली. लखनऊने 13 ओव्हरमध्ये 3 विकेटवर 163 धावा चोपल्या.
A look at the highest totals in the IPL 👇👇@LucknowIPL finish with a score of 257/5.#TATAIPL pic.twitter.com/ET0PM9UQsv
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2023
मार्कस स्टोईनीसची तुफानी फलंदाजी 40 चेंडूत 72 धावा केल्या.
For his stupendous knock of 72, studded with 6 fours and 5 sixes, @MStoinis is our Top Performer from the first innings.
A look at his batting summary here 👇#TATAIPL pic.twitter.com/jf1GuY8700
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2023
आयपीएलमधील 38 सामना आज मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जात आहे. सध्या पंजाब इलेव्हनचा फॉर्म चांगलाच असल्याने, लखनऊसमोर ते निश्चित आव्हानात्मक ठरणार आहे. पंजाबकडे गोलंदाजांची तोफ नसली तरीही उत्तम, अनुभवी गोलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. तर दुसरीकडे लखनऊला त्यांच्या खेळात सुधारणा करणे गरजेचे राहणार आह. मागील सामन्यात त्यांचा गुजरातकडून पराभव झाला. यातून धडा घेऊन जर त्यांनी त्यांच्या खेळात सुधारणा केली नाही, तर निश्चित ते गुणतालिकेत वर असले तरीही ते पुढे जाणार नाहीत.
पंजाब किंग्जचा आत्मविश्वास दुणावला
त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा (MI) त्यांच्या घरच्या मैदानावर शानदार पराभव केला होता. कर्णधार सॅम करणची फलंदाजीतील चमकदार कामगिरी पंजाबसाठी गेल्या सामन्यात पाहायला मिळाली, तर गोलंदाजीत अर्शदीप सिंगने सर्वांना प्रभावित केले. सध्या पंजाबचा संघ गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे, ज्यात त्यांनी आतापर्यंत 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत.
आपण लखनऊ सुपर जायंट्स संघाबद्दल बोललो, तर हा हंगाम त्यांच्यासाठी चांगला म्हणता येणार नाही. लखनऊच्या संघाला त्यांच्या शेवटच्या सामन्यात गुजरातविरुद्ध 7 धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला होता, ज्यामध्ये ते एका वेळी अगदी सहज सामना जिंकताना दिसले होते. 7 सामन्यांत 4 विजय मिळवून संघ आता गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
खेळपट्टीचा अहवाल
पंजाब आणि लखनऊ यांच्यातील हा सामना मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाईल. येथील खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत झालेल्या ५९ आयपीएल सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने ३३ वेळा विजय मिळवला आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २६ वेळा सामना जिंकला आहे. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांपेक्षा वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. येथे पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १६६ धावांच्या जवळ आहे.