Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA World Cup 2026 Final: मेस्सी vs यामाल आमनेसामने! अर्जेंटिना-स्पेन महामुकाबला कधी? भारतात कुठे आणि कसा पहाल?

Argentina Vs Spain Final match 20 july : फिफा विश्वचषत २०२६ स्पर्धेची अंतिम लढत गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात रंगणार आहे. भारतात हा सामने कधी, कुठे आणि कसा पाहता येणार, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 16, 2026 | 04:52 PM
FIFA World Cup 2026 Final: मेस्सी vs यामाल आमनेसामने! अर्जेंटिना-स्पेन महामुकाबला कधी? भारतात कुठे आणि कसा पहाल?
Follow Us
Follow Us:
  • अर्जेंटिना-स्पेन महामुकाबला
  • सामना किती वाजता सुरू होईल?
  • भारतात कुठे आणि कसा पाहाल मोफत?
फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेत आता अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात विजेतेपदासाठी सामना होणार आहे. उपांत्य फेरीत फ्रान्सला २-० ने हरवून स्पेनने अंतिम फेरीत प्रवेश केला, तर अर्जेंटिनाने इंग्लंडला २-१ ने पराभूत करुन सलग दुसऱ्यांदा विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ८ संघांसह सुरू झालेल्या या सर्वात मोठ्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आता २ संघ आमनेसामने येणार आहेत. अर्जेंटिना-स्पेनचा अंतिम सामना तु्म्ही कधी अन् कुठे पाहू शकता, जाणून घ्या.

FIFA World Cup 2026 Final: फुटबॉलची सुंदर कहाणी! ज्याला लहानपणी मिठी मारली, ‘तो खेळाडू फायनलमध्ये मेस्सीला देणार टक्कर

स्पेन आणि अर्जेंटिना फायनसाठी सज्ज

स्पेनने उपांत्य फेरीत फ्रान्सला हरवून १६ वर्षांनंतर फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पेनने शेवटचे २०१० च्या फिफा विश्वचषकात अंतिम फेरीत खेळले होते आणि सामना जिंकला होता. अर्जेंटिनाने इंग्लंडला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पेनसाठी लॅमिन यमाल हा त्यांचा स्टार खेळाडू आहे, तर अर्जेंटिनासाठी मेस्सी ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे.

सामना किती वाजता सुरू होईल?

भारतीय प्रमाणवेळेनुसार हा महामुकाबला सोमवार, २० जुलै रोजी मध्यरात्री १२:३० वाजता सुरू होईल. हा सामना अमेरिकेतील न्यू जर्सी येथील मेटलाइफ स्टेडियमवर खेळला जाईल. स्थानिक वेळेनुसार, सामना १९ जुलै रोजी दुपारी ३:०० वाजता सुरू होईल.

प्रक्षेपण कुठे पाहता येईल?

भारतात, फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना टीव्ही आणि डिजिटल दोन्ही माध्यमांवर पाहता येईल. हा अंतिम सामना ZEE5 वर थेट प्रक्षेपित केला जाईल, जे भारतातील फिफा विश्वचषक २०२६ चे अधिकृत डिजिटल प्रसारक आहे. परंतु ZEE5 वर सामना पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन पॅक असणे आवश्यक आहे. जिओ वापरकर्ते जिओ टीव्ही ॲपवर डीडी स्पोर्ट्सचे प्रक्षेपण पाहू शकतात. याचे प्रसारण युनाईट८ स्पोर्ट्स आणि युनाईट८ स्पोर्ट्स एचडी वर देखील केले जाईल.

मोफत सामना कसा पाहाल?

अतिरिक्त शुल्क न भरता सामना पाहू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात, अंतिम सामना डीडी स्पोर्ट्सवर देखील उपलब्ध असेल, जो डीडी फ्री डिश आणि अनेक डीटीएच प्लॅटफॉर्मवर विनामूल्य पाहता येईल. डीडी स्पोर्ट्स जिओ टीव्हीसारख्या काही टीव्ही सेवा आणि प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना वेगळ्या सबस्क्रिप्शनशिवाय अंतिम सामन्याचा आनंद घेता येईल.

सर्वांच्या नजरा मेस्सी आणि यामालवर

अर्जेंटिना आणि स्पेन या दोन्ही संघांनी प्रभावी कामगिरी करत फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अर्जेंटिनाने बाद फेरीमध्ये केप व्हर्दे, इजिप्त, स्वित्झर्लंड आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसरीकडे, स्पेनने ऑस्ट्रिया, पोर्तुगाल, बेल्जियम आणि फ्रान्सला पराभूत करून आपला उत्कृष्ट आक्रमण आणि मजबूत बचाव दाखवून दिला.

अर्जेंटिनासाठी विजेतेपद राखण्याची आणि सलग दुसऱ्यांदा विश्वविजेते बनण्याची ही संधी आहे. जर त्यांनी असे केले, तर ब्राझिलनंतर असे करणारा तो दुसरा संघ ठरेल. ब्राझिलने १९५८ मध्ये विजेतेपद जिंकले होते आणि १९६२ मध्ये ते राखले होते. तर, स्पेनसाठी चॅम्पियन बनण्याची ही दुसरी संधी आहे.

IND vs ENG: शुभमन गिलच्या फिटनेसने वाढवली चिंता; संघात होणार मोठे बदल? पाहा पिच रिपोर्ट अन् संभाव्य Playing 11 एका क्लिकवर

Web Title: Where to watch fifa world cup 2026 final argentina vs spain messi vs lamine yamal match time live streaming in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • Fifa
  • Fifa World Cup
  • Football Tournament
  • Lionel Messi

संबंधित बातम्या

‘अलविदा अर्जेंटिना’! फुटबॉल जगतात एका सुवर्णयुगाचा अंत; Lionel Messi ने घेतली निवृत्ती, चाहते भावूक
1

‘अलविदा अर्जेंटिना’! फुटबॉल जगतात एका सुवर्णयुगाचा अंत; Lionel Messi ने घेतली निवृत्ती, चाहते भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.