२००७ मध्ये २० वर्षाचा लिओनल मेस्सी स्पॅनिश क्लब बार्सिलोनाकडून खेळत होता. स्पॅनिश वृत्तपत्र ‘डायरिओ स्पोर्ट’ आणि ‘युनिसेफ’साठी एका चॅरिटी कॅलेंडरच्या फोटोशूटकरिता, मेस्सीला एका स्थानिक कुटुंबाच्या पाच महिन्यांच्या बाळासोबत पोज देण्यास सांगितले गेले. त्या बाळाचे नाव होते लामिन यामाल.
फोटोग्राफर जोन मॉनफोर्ट यांनी मेस्सीचे यामालसोबत एका निळ्या प्लास्टिकच्या टबमध्ये बसलेले अनेक फोटो काढले. दरम्यान, निरागस यामालला याची अजिबात कल्पना नव्हती की, ज्या माणसाने त्याला धरले होते, तो पुढे जाऊन फुटबॉलच्या इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक बनेल. शिवाय मेस्सीलाही कधी वाटले नसेल की, हा मुलगा एक दिवस विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भिडेल. आज हा हा फोटो विश्वचषक अंतिम सामन्याआधीची सर्वात मोठी बातमी आहे.

फोटोशूटनंतर, हे फोटो अनेक वर्षे लोकांच्या नजरेपासून दूर होते. मग, २०२४ मध्ये, लामिन यामालच्या वडिलांनी ते सोशल मीडियावर शेअर केले. तो फोटो जगभरात त्वरित व्हायरल झाला. लोकांना कळले की मेस्सीच्या कुशीत बसलेला तोच मुलगा आता बार्सिलोना आणि स्पेनचा नवीन स्टार बनला आहे. आज, हा फोटो फुटबॉलच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चित फोटोपैकी एक मानला जातो.

फुटबॉलमध्ये, पेले आणि मॅराडोना कधीही एकमेकांसमोर आले नाहीत. मॅराडोना आणि मेस्सीसुद्धा एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सामन्यात कधीही एकमेकांसमोर आले नाहीत, पण यावेळी नशिबाने वेगळीच कहाणी रचली आहे. ज्या लहान मुलाला मेस्सीने एके काळी आपल्या कुशीत घेतले होते, तोच आता विश्वचषक अंतिम सामन्यात त्याच्यासमोर उभा राहील. एका बाजूला मेस्सी आहे, तर दुसऱ्या बाजूला यामाल आहे. हे दोघेही अंतिम सामन्यात भिडणार आहेत. त्यामुळे हा सामना अधिक रोमांचक होण्याती शक्यता आहे.
लॅमिन यामालने अगदी लहान वयात स्पेन आणि बार्सिलोनासाठी असंख्य विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्याचे ड्रिब्लिंग, खेळ ओळखण्याची क्षमता आणि आत्मविश्वास यांमुळे तो जगातील सर्वात प्रतिभावान तरुण खेळाडूंपैकी एक बनला आहे. दुसरीकडे, मेस्सीने वयाच्या ३९ व्या वर्षीही अनेक रेकॉर्ड्स मोडले इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, त्याने दोन उत्कृष्ट असिस्ट देऊन अर्जेंटिनाला २-१ असा विजय मिळवून दिला आणि सलग तिसऱ्यांदा विश्वचषक अंतिम फेरीत पोहोचण्यास मदत केली. मेस्सीने या विश्वचषकात सात सामन्यांमध्ये आठ गोल आणि चार असिस्ट केले आहेत. तो गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर असून, ३३ सामन्यांमध्ये २१ गोल आणि १२ असिस्टसह विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
IND vs ENG: भारत-इंग्लंड दुसऱ्या वनडेची वेळ बदलली; सामना नेमका किती वाजता सुरू होणार?






