फोटो सौजन्य - हॉकी इंडिया सोशल मीडिया
आशियाई चॅम्पियन ट्रॉफी २०२४ : भारताचा हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा आत्मविश्वास घेऊन आशियाई चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करत. भारताचा संघ हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली एकही सामना न गमावता सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आशियाई चॅम्पियन ट्रॉफीचे सेमी फायनलचे सामने १६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहेत. भारतीय संघाचे आतापर्यत पाच सामने झाले आहेत, यामध्ये त्यांनी पाचही सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. स्पर्धेमधील सर्व संघाना पराभूत करून टीम इंडिया आता सेमीफायनलसाठी सज्ज झाली आहे. भारताचा संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर आहे, तर दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा संघ आहे.
पाकिस्तानच्या संघाचे पाच सामने झाले आहेत, यामधील त्यांनी फक्त दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर ३ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सेमीफायनलमध्ये चीन आणि कोरियाच्या संघाने सुद्धा प्रवेश केला आहे. यामध्ये चीनचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे तर कोरियाचा संघ चौथ्या स्थानावर आहे. चीनच्या संघाने २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर कोरियाचा संघ फक्त एक सामन्यामध्ये विजय मिळवण्यात यशस्वी झाला आहे.
१६ सप्टेंबर रोजी आशियाई चॅम्पियन ट्रॉफी २०२४ चे सेमीफायनलचे सामने पार पडणार आहे. यामध्ये भारताचा हॉकी संघाचा सामना कोरियाशी होणार आहे. तर पाकिस्तानचा सामना चीनच्या हॉकी संघाशी होणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याचे थेट प्रवाह SonyLiv ॲप आणि वेबसाइटवर पाहता येणार आहे. त्याचबरोबर या सामन्याचे टेलिव्हिजवर थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स टेन 1 आणि टेन 1 एचडी चॅनेलवर उपलब्ध असेल. भारत विरुद्ध कोरिया यांच्यामधील उपांत्य फेरीचा सामना ३.३० PM रोजी आयोजित करण्यात आला आहे. तर चीन विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील सामना १.०० pm सामना होणार आहे.