Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: ऐतिहासिक विजय मिळवूनही टीम इंडिया रिकाम्या हाताने! WTC पॉईंट टेबलमध्ये मिळाला नाही एकही गुण? जाणून घ्या कारण

शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय संघाने फक्त एकदा फलंदाजी केली आणि अफगाणिस्तानला दोन्ही डावात ऑलआऊट करुन इतिहास रचला. या शानदार विजयानंतरही भारतीय संघाला 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप' गुणतालिकेतही एकही गुण मिळाला नाही.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 08, 2026 | 06:56 PM
WTC पॉईंट टेबलमध्ये मिळाला नाही एकही गुण? जाणून घ्या कारण (Photo Credit - X)

WTC पॉईंट टेबलमध्ये मिळाला नाही एकही गुण? जाणून घ्या कारण (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • ऐतिहासिक विजय मिळवूनही टीम इंडिया रिकाम्या हाताने!
  • WTC पॉईंट टेबलमध्ये मिळाला नाही एकही गुण?
  • जाणून घ्या कारण
IND vs AFG Test Match: आयपीएलनंतर भारतीय संघातील खेळाडूंनी जबरदस्त कमाल केली आहे. मुल्लानपूर येथे खेळलेल्या गेलेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG) एकमेव कसोटी सामन्यात भारतीय सघांने एक डाव आणि ३०० धावांनी अफगाणिस्तानचा पराभव केला. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय संघाने फक्त एकदा फलंदाजी केली आणि अफगाणिस्तानला दोन्ही डावात ऑलआऊट करुन इतिहास रचला. या शानदार विजयानंतरही भारतीय संघाला ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ गुणतालिकेतही एकही गुण मिळाला नाही. जाणून घ्या याचे पूर्ण कारण..

टीम इंडियाला WTC मध्ये गुण का मिळाले नाही?

या सामन्यात मोठा विजय मिळवूनही, टीम इंडियाला ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ (WTC) गुणतालिकेत कोणताही फायदा झालेला नाही. या सामन्याचा WTC च्या गुणतालिकेवर कोणताही परिणाम झालेला नाही कारण ही लढत चॅम्पियनशिपचा भाग नव्हती. सध्या नऊ संघ WTC मध्ये सहभागी आहेत आणि त्यात अफगाणिस्तानचा समावेश नाही; भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना हा केवळ एक मैत्रीपूर्ण सामना होता. शिवाय, WTC मालिकांमध्ये साधारणपणे किमान दोन कसोटी सामन्यांचा समावेश असतो, तर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात केवळ एकच कसोटी सामना खेळला गेला.

Setting a new benchmark 📈 Marking our return to Test cricket with our biggest ever innings victory 🇮🇳 Scorecard ▶️ https://t.co/Au50EfVM30#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/NVz3lIAZ3E — BCCI (@BCCI) June 8, 2026

IND Vs AFG: बॅटिंग न करताही संघ कसा जिंकतो? काय आहे Follow-On चा नियम? एकदा वाचाच…

WTC गुणतालिकेत टीम इंडियाचे स्थान काय आहे?

टीम इंडिया सध्या WTC गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. या आवृत्तीत संघाने नऊ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये चार विजय, चार पराभव आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. भारताची सध्याची विजयाची टक्केवारी ४८.१५% इतकी आहे. या आवृत्तीच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्याकरिता, भारताला अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवणे आवश्यक आहे. गुणतालिकेवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, ऑस्ट्रेलिया सध्या पहिल्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका ७५% विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे.

मानव सुथारने शानदरा गोलंदाजी

मानव सुथारने आपल्या कसोटी कारगिर्दीची ऐतिहासिक सुरुवात केली आहे. मुल्लांपूर येथे सुरु असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात मानव सुथारने २२ ओव्हरमध्ये ६ विकेट्स घेत इतिहास रचला आहे. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ केवळ १५२ धावांत गारद झाला. आतापर्यंत केवळ १० भारतीय गोलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. इतकेच नव्हे, तर भारतीय संघासाठी ही कामगिरी करणारा तो सातवा फिरकी गोलंदाज ठरला. भारतासाठी कसोटी पदार्पणात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम नरेंद्र हिरवाणी यांच्या नावावर आहे.

Manav Suthar: पहिल्याच कसोटीत 6 विकेट्स, मानव सुथारने इतिहास रचत दिग्गजांना टाकले मागे

Web Title: Why team india did not get any points in wtc points table despite historic win explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Team India
  • Test cricket
  • WTC Point Table

संबंधित बातम्या

इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात
1

इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.