(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
चित्रपटाची मजेदार कथा, कॉमिक टाइमिंग आणि अक्षयच्या अभिनयाची फटकेबाजी प्रेक्षकांसाठी अनुभवायला मिळणार आहे. बालाजी मोशन पिक्चर्सची आगामी फिल्म ‘भूत बंगला’, ज्यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे, तिची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. याआधी हा चित्रपट 15 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र आता मेकर्सनी हा चित्रपट प्रीपोन करत 10 एप्रिल 2026 रोजी सिनेमागृहात आणण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे, आणि सोशल मीडियावरही ‘भूत बंगला’बाबत चर्चेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हा निर्णय पूर्णपणे रणनीतीपूर्वक घेतल्याचे मानले जात आहे. अक्षय कुमारच्या वर्षभरातील व्यस्त थिएट्रिकल रिलीज लाइनअपचा विचार करून आणि प्रेक्षकांचे लक्ष एका चित्रपटावर केंद्रित राहावे, यासाठी ही नवी रिलीज डेट ठरवण्यात आली आहे. कमी बॉक्स ऑफिस स्पर्धा असलेल्या काळात चित्रपट प्रदर्शित करून त्याला योग्य वेळ आणि स्पेस मिळावी, हाच मेकर्सचा मुख्य उद्देश आहे.
‘भूत बंगला’बाबत घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, हा चित्रपट अक्षय कुमार एका दमदार कॉमेडी-एंटरटेनर अवतारात सादर करणार आहे. अक्षय कुमार स्वतःही आपल्या प्रत्येक चित्रपटाला सिनेमागृहात योग्य वेळ मिळावा, याकडे विशेष लक्ष देत असल्याचे दिसते.
हा चित्रपट बालाजी मोशन पिक्चर्स (बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडचा एक विभाग) आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात येत आहे. चित्रपटात अक्षय कुमार याच्यासोबत वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले असून, निर्मितीची जबाबदारी अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता आर कपूर यांनी सांभाळली आहे.






