एयूएम डिसेंबर २०२५ पर्यंत १२,३३० कोटी रूपये राहिला, ज्यामध्ये वार्षिक २१ टक्के वाढ झाली. आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीत वितरण वार्षिक ११ टक्के वाढीसह १,०३० कोटी रूपये होते. आर्थिक वर्ष २६ च्या नऊमाहीमध्ये वितरण वार्षिक ९ टक्के वाढीसह २,७६८ कोटी रूपये होते. आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी एकूण उत्पन्न वार्षिक २२ टक्के वाढीसह ५६९ कोटी रूपये होते. आर्थिक वर्ष २६ च्या नऊमाहीसाठी एकूण उत्पन्न वार्षिक २७ टक्के वाढीसह १,६५२ कोटी रूपये होते.
आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी निव्व्ळ नफा* वार्षिक २६ टक्के वाढीसह २३९ कोटी रूपये होता. आर्थिक वर्ष २६ च्या नऊमाहीसाठी निव्वळ नफा* वार्षिक २६ टक्के वाढीसह ६८५ कोटी रूपये होता.
आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी आरओए व आरओई अनुक्रमे ७.९ टक्के व २०.२ टक्के होते. आर्थिक वर्ष २६ च्या नऊमाहीसाठी आरओए व आरओई अनुक्रमे ७.९ टक्के व २०.० टक्के होते, जे उद्योगामध्ये सर्वोत्तम होते.
नवीन कामगार संहितेमुळे होणारा अतिरिक्त खर्च वगळून, मागील सेवा खर्च ३.८५ कोटी रूपये (करानंतर निव्वळ २.९९ कोटी रूपये).
कामगिरीची मुख्य वैशिष्ट्ये
(कोटी रूपये)
तपशील
आर्थिक वर्ष २६ ची तिसरी तिमाही
आर्थिक वर्ष २५ ची तिसरी तिमाही
वार्षिक वाढ
आर्थिक वर्ष २६ ची नऊमाही
आर्थिक वर्ष २५ ची नऊमाही
वार्षिक वाढ
एयूएम
१२,३३०
१०,२२६
२१ टक्के
१२,३३०
१०,२२६
२१ टक्के
वितरण
१,०३०
९३०
११ टक्के
२,७६८
२,५४०
९ टक्के
एकूण उत्पन्न
५६९
४६५
२२ टक्के
१,६५२
१,३०५
२७ टक्के
निव्वळ नफा
२३९*
१९१
२६ टक्के
६८५*
५४४
२६ टक्के
एकूण एनपीए (टक्के)
१.६ टक्के
१.३ टक्के
२८ बीपीएस
१.६ टक्के
१.३ टक्के
२८ बीपीएस
निव्वळ एनपीए (टक्के)
१.२ टक्के
१.० टक्के
२२ बीपीएस
१.२ टक्के
१.० टक्के
२२ बीपीएस
ओपेक्स (टक्के)
२.७ टक्के
२.६ टक्के
१६ बीपीएस
२.७ टक्के
२.६ टक्के
५ बीपीएस
आरओए (टक्के)
७.९ टक्के
७.७ टक्के
२८ बीपीएस
७.९ टक्के
७.७ टक्के
१८ बीपीएस
आरओई (टक्के)
२०.२ टक्के
१८.८ टक्के
१४७ बीपीएस
२०.० टक्के
१८.५ टक्के
१५० बीपीएस
नवीन कामगार संहितेमुळे होणारा अतिरिक्त खर्च वगळून, मागील सेवा खर्च ३.८५ कोटी रूपये (करानंतर निव्वळ २.९९ कोटी रूपये)
या निकालांबाबत मत व्यक्त करत व्यवस्थापकीय संचालक श्री. पी. बालाजी म्हणाले, ”आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये विकास गती कायम राहिली, ज्याला व्यवसायामध्ये स्थिर वाढ आणि सतर्क पोर्टफोलिओ व्यवस्थापनाचे पाठबळ मिळाले. आर्थिक वर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीत एयूएम वार्षिक २१ टक्के वाढून १२,३३० कोटी रूपयांपर्यंत पोहोचला, तसेच वितरण वार्षिक ११ टक्के वाढून १,०३० कोटी रूपयांपर्यंत पोहोचले.
आम्ही कॅलेंडर वर्षादरम्यान ३७ नवीन ठिकाणी उपस्थिती निर्माण करत आमचे नेटवर्क ३३५ शाखांपर्यंत वाढवले. अधिक पुढे जात नवीन राज्यांमध्ये शाखा विस्तारीकरणवर लक्ष केंद्रित केले जाईल, तसेच विद्यमान राज्यांमधील कमी पोहोच असलेल्या निवडक भागांमध्ये उपस्थिती वाढवण्यावर भर दिला जाईल.
मालमत्ता दर्जासंदर्भात एकूण एनपीए व निव्वळ एनपीए अनुक्रमे १.५६ टक्के आणि १.१८ टक्के यावर स्थिर राहिले. संकलनातील हंगामी चढ-उतारामुळे (सणासुदीच्या काळासह) ३० हून अधिक डीपीडीमध्ये किंचित वाढ झाली, जो ६.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
नफ्यासंदर्भात, आर्थिक वर्ष २६ च्या नऊमाहीमध्ये एकूण उत्पन्न वार्षिक २७ टक्के वाढीसह १,६५२ कोटी रूपयांपर्यंत वाढले. निधी खर्चामध्ये ८.४ टक्के कपात झाल्यामुळे आर्थिक वर्ष २६ च्या नऊमाहीमध्ये आमचे स्प्रेड्स ८.९ टक्क्यांपर्यंत सुधारले. आर्थिक वर्ष २६ च्या नऊमाहीमध्ये ओपेक्स गुणोत्तर २.७ टक्क्यांपर्यंत स्थिर राहिले, ज्यामुळे ऑपरेटिंग नफा वार्षिक २८ टक्के वाढीसह ९३३ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. आर्थिक वर्ष २६ च्या नऊमाहीसाठी क्रेडिट खर्च आमच्या अंदाजित रेंजमध्ये ५० बीपीएसवर स्थिर राहिला.
तिमाहीसाठी निव्वळ नफा* वार्षिक २६ टक्के वाढीसह २३९ कोटी रूपये राहिला. तिमाहीसाठी आरओए व आरओई अनुक्रमे ७.९ टक्के आणि २०.२ टक्के राहिले. आर्थिक वर्ष २६ च्या नऊमाहीसाठी निव्वळ नफा* वार्षिक २६ टक्के वाढीसह ६८५ कोटी रूपये राहिला, तसेच आरओए व आरओईमध्ये अनुक्रमे ७.९ टक्के आणि २०.० टक्के वाढ झाली, जे उद्योगामध्ये सर्वोत्तम आहेत. या कामगिरीमधून वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ आणि उत्पन्न विभागांमधील व्यापक ग्राहकवर्गाचा पाठिंबा दिसून येतो, ज्यामुळे बाजारपेठेतील चढ-उतारादरम्यान संतुलन व स्थिरता मिळते.
तंत्रज्ञान आणि डेटा-केंद्रित निर्णय प्रक्रिया आमच्या विकासासाठी व जोखीम शिस्तबद्धतेसाठी महत्त्वाचे घटक आहेत, ज्यामुळे आम्हाला विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये विश्वसार्हपणे विस्तार करण्यास मदत झाली आहे. आम्ही डिजिटायझेशनमध्ये आघाडीवर आहोत, जेथे ९२ टक्क्यांहून अधिक करार डिजिटल पद्धतीने केले जात आहेत आणि ९४ टक्क्यांहून अधिक संकलन डिजिटल चॅनेल्सच्या माध्यमातून होत आहे. अकाऊंट अॅग्रीगेटर डेटा आणि क्रेडिट ब्युरो माहितीचा वाढता वापर आमच्या कर्ज मंजुरी प्रक्रियेला अधिक अचूक बनवत आहे. यामुळे पोर्टफोलिओचा दर्जा सुधारत आहे, मोठ्या कर्जांच्या आणि सक्षम ग्राहक वर्गातील वाढीस चालना मिळत आहे.
गेल्या काही तिमाहींमध्ये आम्ही उच्च दर्जाचा ग्राहकवर्ग तयार करण्यासाठी मोठ्या रकमेच्या कर्ज विभागाकडे वळण्याचा आमचा हेतू व्यक्त करत आहोत. या धोरणाला अनुसरून आम्ही ७ लाख रूपयांपेक्षा कमी कर्ज मंजूरी बंद केली आहे, ज्यामुळे या वर्षातील कर्ज वितरणात काही प्रमाणात घट दिसून आली आहे. असे असताना देखील चालू आर्थिक वर्षात एयूएममध्ये २० ते २१ टक्के वाढ होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. भविष्याकडे वाटचाल करत आम्हाला भर करण्यात येणाऱ्या नवीन शाखा, चॅनेलचा विस्तार, उच्च एटीएस, एनआयएमबाबत तडजोड न करता गृहकर्ज व्याजदारांमध्ये काहीशी वाढ आणि सुधारित उत्पादकतेसह एयूएममध्ये २२ ते २४ टक्के वाढीची अपेक्षा आहे.”






