फोटो सौजन्य - rohitsharma45 / Vimal कुमार
रोहित शर्मा : भारताचा संघ T२० विश्वचषक २०२४ चे (T-20 world Cup 2024) जेतेपद मिळवून विश्वविजेता झाला आहे. भारताच्या संघाने हे जेतेपद तर मिळवले पण टीम इंडियाच्या तीन दमदार खेळाडूंनी संघ विजयी झाल्यानंतर निवृत्ती घोषणा केली आणि चाहते निराश झाले. टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये जेतेपद जिंकल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) T२० फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो त्याचे एकदिवसीय आणि कसोटी सामान्यांमधील निवृत्तीवर बोलताना दिसला. कॅप्टन रोहित शर्माचे वय लक्षात घेता २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा करेल अशी अटकळ बांधली जात होती. आता त्याने स्वतः यावर सविस्तर माहिती दिली आहे.
१४ जुलै रोजी डॅलस येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये रोहित शर्मा उपस्थित होता. जेव्हा रोहित शर्माला एकदिवसीय आणि कसोटीतून निवृत्तीबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा हिटमॅनने सांगितले की, तो खूप पुढे विचार करत नाही, परंतु सध्या चाहते त्याला खूप खेळताना पाहणार आहेत असे त्याने सांगितले. त्याचबरोबर अजून बरेच क्रिकेट बाकी आहे असेही तो म्हणाला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या चाहत्यांनी रोहितच्या या उत्तराला टाळ्या वाजवून दाद दिली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
At least you will see me playing for a while! Says Rohit Sharma in Dallas. pic.twitter.com/wADSJZj6b5
— Vimal कुमार (@Vimalwa) July 14, 2024
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते की, आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि आयसीसी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार आहे. मात्र, जय शाहने २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत काहीही बोलले नाही. अशा परिस्थितीत हिटमॅन २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंतच वनडे फॉरमॅट खेळेल, आता रोहितनेच सर्व संभ्रम दूर केला आहे.