नीरज चोप्रा जर्मनीला रवाना : भारताच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरीवर नजर टाकली तर भारताने ऑलिम्पिक २०२४ मध्ये ६ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ५ कांस्यपदकांचा समावेश आहे तर एक रौम्य पदकाचा समावेश आहे. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ८९.४५ मीटर भाला फेकून दुसरे स्थान गाठून सिल्वर मेडलवर कब्जा केला आहे. ११ ऑगस्ट रोजी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ रोजी समारोप समारंभ पार पडला. भारताचे अनेक खेळाडू मायदेशी परतले आहेत. यानंतर १३ ऑगस्टला नीरज इतर भारतीय खेळाडूंसह भारतात परतणार होता. परंतु तो मायदेशी भारतामध्ये न परतण्याऐवजी नीरज पॅरिसहून थेट जर्मनीला रवाना झाला अशी माहिती समोर आली आहे. पण नीरजला अचानक जर्मनीला का जावं लागलं? यामागचं कारण काय?
मीडियाच्या माहितीनुसार, असे म्हंटले जात आहे की, नीरजला वैद्यकीय सल्ल्याने जर्मनीला जावे लागले आहे. नीरज चोप्राला हर्नियाचा त्रास आहे, त्यामुळे त्यांना जर्मनीला जावे लागले. नीरज चोप्राचे काका भीम चोप्रा यांनी ‘आज तक’शी बोलताना नीरजच्या जर्मनीला जाणे गरजेचे होते, त्यांनी नीरज चोप्राच्या वैद्यकीय सल्ल्याबद्दल खुलासा केला.
हेदेखील वाचा – क्रिकेटप्रेमींसाठी लॉटरी! अवघ्या 50 रुपयांमध्ये तिकीट उपलब्ध; दुपारच्या जेवणाची आणि चहाचीही सोय उपलब्ध
भारतीय स्टारच्या काकांनी सांगितले की, नीरज उपचारासाठी थेट पॅरिस, जर्मनीला गेला आहे. ते पुढे म्हणाले की, गरज पडल्यास नीरजवरही शस्त्रक्रिया करण्यात येईल. तो जवळपास महिनाभर जर्मनीत राहणार आहे.
रौप्य पदक जिंकल्यानंतर, नीरज चोप्राने स्वत: उघड केले होते की मांडीच्या समस्येमुळे तो फार कमी स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतो. यावेळी त्यांनी शस्त्रक्रियेबद्दलही सांगितले. पदक जिंकल्यानंतर नीरज म्हणाला, “मी माझ्या टीमशी बोलून त्यानुसार निर्णय घेईन. माझ्या शरीराची सध्याची स्थिती असूनही मी स्वत:ला पुढे ढकलत आहे. माझ्या आत खूप काही आहे आणि त्यासाठी मला स्वत:ला तंदुरुस्त ठेवावे लागेल.”